आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवारी म्हणजेच 7 डिसेंबर रोजी IMDb ने या वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय स्टार्सची यादी प्रसिद्ध केली आहे. दाक्षिणात्य अभिनेता धनुषने या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे, तर आलिया भट्टने दुसरे स्थान पटकावले आहे. याशिवाय सामंथा रुथ प्रभू, हृतिक रोशन, साऊथ स्टार यश यांसारख्या अनेक सेलिब्रिटींचा या यादीत समावेश आहे. विशेष बाब म्हणजे या यादीत RRR चित्रपटाच्या तीनही सेलिब्रिटींचा समावेश आहे, या तिघांनाही टॉप 10 च्या यादीत स्थान मिळाले आहे.
IMDb लिस्टमधील 10 सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते
या यादीत धनुष आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आलिया, तिसऱ्या क्रमांकावर ऐश्वर्या राय बच्चन, चौथ्या क्रमांकावर राम चरण तेजा आणि पाचव्या क्रमांकावर सामंथा रुथ प्रभू आहे. याशिवाय सहाव्या क्रमांकावर हृतिक रोशन, सातव्या स्थानावर कियारा आडवाणी, आठव्या स्थानावर ज्युनिअर एनटीआर, नवव्या स्थानावर अल्लू अर्जुन आणि दहाव्या स्थानावर यशचा समावेश आहे.
आलियाने व्यक्त केला आनंद
आयएमडीबीचे आभार मानताना आलिया म्हणाली- 'मला 2022 मध्ये या यादीत सहभागी होण्याची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद झाला आहे. या वर्षात मी अनेक उत्कृष्ट चित्रपटांचा भाग झाले. माझ्या चित्रपटांवर एवढ्या प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल मी माझ्या हृदयापासून प्रेक्षकांचे आभार मानू इच्छिते. IMDb ही एक विश्वसनीय साइट आहे जी प्रेक्षकांचे खरे मत देते. मला आशा आहे की यापुढेही मी माझ्या कामाने प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकेन. सर्वांचे मनापासून आभार.'
आलियाने 6 नोव्हेंबर रोजी एका मुलीला जन्म दिला आहे. सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. आलिया लवकरच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय लवकरच आलिया प्रियंका आणि कतरिनासोबत 'जी ले जरा' या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.