आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा बोहल्यावर चढणार रजनीकांत यांचा जावई:18 वर्षांचा पहिला संसार मोडल्यानंतर धनुष करणार दुसरे लग्न, होणारी दुसरी पत्नीही विवाहित

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता धनुष दुसऱ्याच्या लग्नाची तयारी करतोय. रजनीकांत यांची लेक आणि पत्नी ऐश्वर्या रजनीकांत हिच्यापासून विभक्त झाल्यानंतर धनुषने दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला आहे. 18 वर्षांचा संसार मोडित काढत 2022 मध्ये हे दोघे विभक्त झाले होते.

मल्याळम अभिनेत्रीसोबत करणार दुसरे लग्न
धनुष मल्याळम अभिनेत्री मीनाबरोबर दुसरे लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. ‘न्यूज 18 हिंदी’च्या वृत्तानुसार, अभिनेता बलवानने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये धनुषच्या दुसऱ्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. त्यांनी धनुष लग्नाची तयारी करत असल्याचेही म्हटले आहे.

मीनाचेही हे दुसरे लग्न असणार आहे. तिला एक मुलगी आहे. शिवाय धनुषलाही यात्रा आणि लिंगा अशी दोन मुले आहेत. पण अद्यापही धनुषने त्याच्या दुसऱ्या लग्नाबाबत मौन कायम राखले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती घटस्फोटाची बातमी
धनुष आणि ऐश्वर्या हे दक्षिणेतील पॉवर कपल मानले जात होते. दोघे विभक्त होणार असल्याची बातमी आल्यानंतर दोघांच्या चाहत्यांना मोठा झटका बसला होता.

घटस्फोटाबद्दल धनुष आणि ऐश्वर्या यांनी सोशल मीडियावर लिहिले होते, "आम्ही 18 वर्षे मैत्री, कपल, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून ग्रोथ, समजूतदारपणा आणि भागीदारीचा मोठा पल्ला गाठला आहे. आज आम्ही जिथे उभे आहोत तिथून आमचे मार्ग वेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी कपल म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या गोपनीयतेचा आदर करा."

2002 मध्ये झाली होती दोघांची भेट
2002 मध्ये kadhal konden चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या वेळी ऐश्वर्या आणि धनुष यांची पहिली भेट झाली होती. चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ऐश्वर्या वडील रजनीकांत यांच्यासह आली होती. त्यावेळी धनुषचा अभिनय पाहून ती त्याच्या प्रेमात पडली होती. ऐश्वर्याने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर या दोघांची मैत्री वाढत गेली आणि त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते.

18 नोव्हेंबर 2004 रोजी धनुष आणि ऐश्वर्याचे थाटामाटात लग्न धाले होते. धनुषने ऐश्वर्याच्या दिग्दर्शनात बनलेल्या '3' मध्ये काम केले आहे. या चित्रपटातील 'कोलावेरी डी' हे गाणे 2011 मधील सर्वात हिट गाणे होते.

धनुष-ऐश्वर्याचा घटस्फोट का झाला:3 वर्षांपासून दोघांत निर्माण झाला होता दुरावा, 3 अभिनेत्रींसोबत धनुषच्या अफेअरच्या चर्चा आणि ऐश्वर्याचे अपयशी करिअर ठरले कारण

सोमवारी रात्री दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांनी त्यांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणत विभक्त होण्याची घोषणा केली. या बातमीने संपूर्ण साऊथ फिल्म इंडस्ट्रीसह बॉलिवूडलाही धक्का बसला. दोघांना आदर्श जोडपे मानले जात होते. धनुष हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी स्टार्सपैकी एक आहे. ऐश्वर्या एक चित्रपट दिग्दर्शिका आहे. दोघांचा घटस्फोट का झाला? संपूर्ण इंडस्ट्रीसोबतच चाहत्यांच्याही मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे. वाचा घटस्फोटामागील कहाणी...