आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुपरस्टार धनुषचे आणखी एक गाणे सुपरडुपर हिट झाले आहे. धनुषने ‘मेरी -2’ या तमिळ चित्रपटातील 'राउडी बेबी' हे गाणे गायले आहे. या गाण्याला यूट्युबवर तब्बल 100 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. यूट्युबवर एवढे व्ह्यूज मिळवणारे हे पहिले दाक्षिणात्य गाणे ठरले आहेत.
'मारी 2' हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता आणि या चित्रपटातील 'राउडी बेबी' या गाण्याला धनूषसह धीने स्वरसाज चढवला होता. युवन शंकर राजा याने या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याचे बोल स्वत: धनुषने लिहिले आहेत. या गाण्यात धनुष आणि साई पल्लवीची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
चाहत्यांचे मनापासून आभार - धनुष
आपला हा आनंद व्यक्त करताना धनुषने एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतोय, “काय सुंदर योगायोग आहे. राउडी बेबी या गाण्याला 100 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे 9 वर्षांपूर्वी याच दिवशी माझ्या वाय धिस कोलावर डी या गाण्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. हे पहिले दाक्षिणात्य गाणे आहे ज्याला युट्यूबवर 100 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. या अचिव्हमेंटसाठी सर्व चाहत्यांचे मनापासून आभार.”
What a sweet coincidence this is ❤️❤️ Rowdy baby hits 1 billion views on same day of the 9th anniversary of Kolaveri di. We are honoured that this is the first South Indian song to reach 1 billion views. Our whole team thanks you from the heart ❤️❤️
— Dhanush (@dhanushkraja) November 16, 2020
2011 मध्ये रिलीज झाले होते 'कोलावरी डी' हे गाणे
'कोलावरी डी' हे गाणे 2011 मध्ये रिलीज झाले होते. या गाण्याचे बोल तामिळ आणि इंग्रजी भाषेत होते. धनुषच्या आवाजात हे गाणे देश आणि जगात खूप लोकप्रिय झाले होते. हे गाणे धनुषची प्रमुख भूमिका असलेल्या '3' या चित्रपटातील आहे. अनिरुद्ध रविचंद्रन याचे संगीतकार आहे. या गाण्याला आतापर्यंत 2.8 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
धनुषच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांन अनुभवायला मिळणार आहे. आगामी 'अतरंगी रे' या चित्रपटात धनुषची महत्त्वपूर्ण भूमिका आहे शिवाय तो या चित्रपटात पार्श्वगायनदेखील करणार असल्याचे समजते. या चित्रपटाला ए.आर. रहमान यांचे संगीत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.