आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांनंतर पुन्हा प्रदर्शित झाला धनुषचा '3':बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतेय फिल्म, 'व्हाय दिस कोलावेरी डी' याच चित्रपटातील होते गाणे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

असे अनेक चित्रपट आहेत ज्यांना पहिल्यांदा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नाही. मात्र, जेव्हा तेच चित्रपट पुन्हा प्रदर्शित होतात तेव्हा ते बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. धनुषच्या '3' चित्रपटाबाबतही असेच काहीसे घडले आहे. खरं तर, 2012 मध्ये आलेल्या 3 या चित्रपटाचे तेलुगु व्हर्जन धनुषचे वडील आणि चित्रपट निर्माते कस्तुरी राजा यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आले आहे. आणि त्याला मिळालेला प्रतिसाद अवाक् करणारा आहे. हा प्रतिसाद व्यापार विश्लेषकांनाही धक्का देणारा आहे.

'3' या चित्रपटातील गाणे 'व्हाय दिस कोलावेरी डी'

कस्तुरी राजा प्रोडक्शन निर्मित '3' हा चित्रपट ऐश्वर्या रजनीकांतचे दिग्दर्शन क्षेत्रातील पदार्पण होते. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने जगभरात खळबळ उडवून दिली होती. चित्रपटातील कोलावेरी डी हे गाणे चित्रपटाच्या अधिकृत रिलीजपूर्वीच लीक झाले होते. हे गाणे लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. पण गाण्यांच्या तुलनेत चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. त्यावेळी हे गाणे लोकांची ओठी रेंगाळले होते, पण चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष गर्दी झाली नव्हती.

10 वर्षांनंतर मिळतोय या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद

10 वर्षांनंतर पुन्हा एकदा '3' चित्रपटगृहात हा चित्रपट आल्यावर या चित्रपटाबद्दल शॉकिंग रिस्पॉन्स बघायला मिळतोय. हा चित्रपट फक्त तेलुगू भाषिक शहरांमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला, जिथे 150 हून अधिक चित्रपटगृह हाऊसफुल्ल राहिले. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत होते ज्यात थिएटरमध्ये चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली होती.

काय आहे चित्रपटाची कथा?

'3' ही एका तरुण जोडप्याची एक शोकांतिका आहे, जी मानसिक आजाराचे जीवन हादरवणारे परिणाम दर्शवते. धनुषशिवाय या चित्रपटात श्रुती हासन आणि शिवकार्तिकेयन यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट पहिल्यांदा 30 मार्च 2012 रोजी प्रदर्शित झाला होता.

धनुषच्या अलीकडच्या चित्रपटाने केली आहे रेकॉर्डब्रेक कमाई
धनुषच्या 'तिरुचित्रम्बलम' या चित्रपटाने अलीकडेच बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 100 कोटींची कमाई केली आहे. याशिवाय 2022-2023 मध्ये तो नाने वरुवेन कॅप्टन मिलर, सर/वाथी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. 2022 मध्येच धनुष अतरंगी रे या बॉलिवूड चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याची भूमिका खूप पसंत केली गेली.

बातम्या आणखी आहेत...