आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'धारावी बँक'चा टिझर रिलीज:थलायवनच्या भूमिकेत दिसणार सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉयसोबत होणार सामना

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आश्रम, भौकाल आणि रक्तांचल नंतर लवकरच MX Player घेऊन येत आहे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणा-या धारावीची कहाणी. MX Player ने नुकताच त्यांच्या आगामी 'धारावी बँक' या वेब सिरीजचा टीझर रिलीज केला आहेय या सिरीजमध्ये सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय आणि सोनाली कुलकर्णी या कलाकारांच्या भूमिका आहेत. या सिरीजद्वारे सुनील शेट्टी ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे. गुन्हेगारी विश्वाचा सर्वेसर्वा असलेल्या थलायवनचे पात्र त्याने साकारले आहे. तर विवेक ओबरॉय जेसीपी जयंत गावस्कर या पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. झी स्टुडिओज निर्मित आणि समित कक्कर दिग्दर्शित या सिरीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या या सिरीजची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच या सिरीजचा ट्रेलरही प्रदर्शित होणार आहे. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...