आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी:धर्मेंद्र आणि हेमा यांच्या लग्नाला 40 वर्षे पूर्ण , लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  ईशा देओलने थ्रोबॅक छायाचित्र शेअर करुन दिल्या शुभेच्छा 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री ईशा देओलने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या आईवडिलांची काही सुंदर छायाचित्रे शेअर केली आहेत.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि ड्रीमगर्ल हेमा मालिनी 1980 मध्ये लग्नबंधनात अडकले. आज हे दोघेही त्यांच्या लग्नाचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिनाचे औचित्य साधत त्यांची मुलगी ईशा देओल हिने काही सुंदर थ्रोबॅक छायाचित्र शेअर करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री ईशा देओलने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या आईवडिलांची काही सुंदर छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यांना शुभेच्छा देताना ईशाने लिहिले, माझ्या प्रिय आईबाबा, माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि देवाला प्रार्थना करते की तुम्ही दोघेही असंख्य वर्षे असेच एकत्र रहा, निरोगी रहा आणि आनंदी रहा. ईशा, भारत, राध्या आणि मियूकडून खूप खूप प्रेम.

हेमा-धर्मेंद्रची लव्ह स्टोरी 

1970 मध्ये आलेल्या 'तुम हसीन मैं जवान' या चित्रपटातून धर्मेंद्र आणि हेमा पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते. त्यानंतर ही जोडी पडद्यावरील हिट जोडी ठरली. दोघांनी 'सीता और गीता', 'शोले' आणि 'राजा राणी' अशा बर्‍याच चित्रपटांत एकत्र काम केले. धर्मेंद्र विवाहित असूनही दोघे प्रेमात पडले. हेमा दक्षिण भारतीय कुटुंबातील असून धर्मेंद्र पंजाबी आहेत. हेमाचे कुटुंबीय त्यांच्या नात्याविरूद्ध होते. अनेक अडचणींचा सामना करुन दोघांनी लग्न केले. लग्नासाठी दोघांनीही धर्म बदलला होता. ईशा आणि अहाना ही त्यांच्या मुलींची नावे आहते.  

बातम्या आणखी आहेत...