आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धर्मेंद्र आणि हेमा यांचे अभिनंदन:पुन्हा एकदा आजी-आजोबा झाले हेमामालिनी आणि धर्मेंद्र, धाकटी मुलगी अहानाने दिला जुळ्या मुलींना जन्म

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 26 नोव्हेंबर रोजी अहानाने जुळ्या मुलींना जन्म दिला.

84 वर्षीय धर्मेंद्र पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. त्यांची आणि हेमा हेमा मालिनी यांची धाकटी मुलगी अहाना देओल (35) हिने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. शुक्रवारी अहानाने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

अहानाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘अॅस्ट्राइया आणि अदिया वोहरा या जुळ्या मुलींचे 26 नोव्हेंबर रोजी आमच्या घरात आगमन झाले

2014 मध्ये झाले होते अहानाचे लग्न
मीडियापासून कायम दूर राहणा-या अहाना देओलने 2014 मध्ये दिल्ली येथील बिझनेसमन विपिन वोहरा यांचा मुलगा वैभव वोहराशी लग्न केले. वैभव स्वत: देखील एक बिझनेसमन आहे. 2015 मध्ये अहाना आणि वैभव यांचा मुलगा डॅरियन जन्म झाला.

अहाना देओल चित्रपटांपासून दूर

अहानाने 2010 मध्ये संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय स्टारर फिल्म ‘गुजारिश’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. तिने चित्रपटसृष्टीपासून दूर राहणेच पसंत केले आहे.

धर्मेंद्र आणि हेमा यांना दोन मुली
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मोठी मुलगी ईशा देओल देखील दोन मुलींची आई आहे. 2012 मध्ये बिझनेसमन भरत तख्तानीशी लग्न करणार्‍या ईशाने ऑक्टोबर 2017 मध्ये राध्या आणि जून 2019 मध्ये दुसरी मुलगी मिरायाला जन्म दिला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser