आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देओल्सची तिसरी पिढी:आजोबा धर्मेंद्र यांनी केली नातवाच्या बॉलिवूड पदार्पणाची घोषणा, इंडस्ट्रीत पाऊल ठेवतोय सनी देओलचा धाकटा मुलगा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजवीर देओलला राजश्री बॅनरच लाँच करणार

राजश्री प्रॉडक्शन आपल्या बॅनरखाली सनी देओल यांचा धाकटा मुलगा राजवीर देओलला लाँच करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. आता ही बातमी खरी ठरली आहे. या प्रॉडक्शन हाऊसने बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर अकाउंटवर एक पोस्ट टाकली आहे. त्या माध्यमातून ते राजवीरला लाँच करणार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी राजवीरचा मोठा भाऊ करण देओलने 'पल पल दिल के पास' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

आजोबा धर्मेंद्र म्हणाले - माझ्या नातवालाही तुमचे प्रेम द्या
अभिनेते धर्मेंद्र यांनीदेखील आपल्या नातवाचा फोटो शेअर करत ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्यांनी लिहिले,‘माझा नातू राजवीर, अवनीश बडजात्यासोबत सिनेमा जगतात प्रवेश करणार आहे. माझ्यावर ज्या प्रकारे जनतेने प्रेम केले त्याच प्रकारे या दोन्ही मुलांनादेखील तसेच प्रेम करावे अशी मी प्रेक्षक माय-बापाला विनंती करतो. शुभेच्छा... देव तुम्हाला सुखी ठेवो...'

रोमँटिक असेल राजवीर-अवनीशचा चित्रपट
या चित्रपटातून सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीशदेखील दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. हा राजश्री बॅनरमध्ये तयार होत असलेला 59 वा चित्रपट असेल. या चित्रपटात येणा-या पिढीची लव्ह स्टोरी असेल. यापूर्वी राजवीरचा भाऊ करणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याचा पल पल दिल के पास हा चित्रपट सनी देओल यांनी दिग्दर्शित केला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता.

राजवीरविषयी सांगायचे म्हणजे, त्याने दिग्दर्शक फिरोज अब्बास खान यांचा असिस्टंट म्हणून काम केले आहे. राजवीरचा पहिला बॉलिवूड चित्रपट यावर्षी जुलै महिन्यात फ्लोअरवर येणार असून 2022 मध्ये तो प्रदर्शित होईल.

बातम्या आणखी आहेत...