आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रविवारी संध्याकाळी ते रुग्णालयातून घरी परतले. व्यायाम करत असताना धर्मेंद्र यांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर धर्मेंद्र यांनी एक व्हिडीओ शेअर करत आपल्या तब्येतीविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.
मसल पेनमुळे झाले होते रुग्णालयात दाखल
धर्मेंद्र यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. व्हिडिओत धर्मेंद्र म्हणाले, "माझ्या मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. मी जे केले त्याचा परिणाम मला भोगावे लागले आहेत. पाठीवरची एक मसल खेचली गेल्याने मला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील चार दिवसांमध्ये मला बराच त्रास झाला. पण आता तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि आशीर्वादांमुळे मी ठीक आहे आणि घरी परतलो आहे. काळजी नसावी. यापुढे मी असे काहीच करणार नाही. काळजी घेईन."
'रॉकी और रानी की प्रेम कहानी'त दिसणार आहेत धर्मेंद्र
86 वर्षीय धर्मेंद्र आजही फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. ते चित्रपटांसह मुंबईनजीकच्या आपल्या फार्महाऊसवर शेती देखील करतात. ते आपल्या दिनचर्येचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. ते लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासह जया बच्चन, शबाना आझमी, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय ते 'अपने' या चित्रपटाच्या दुस-या भागात म्हणजेच 'अपने 2'मध्ये सनी देओल आणि बॉबी देओलसोबत दिसणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.