आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अलविदा सुरमा भोपाली:जगदीप यांच्या निधनाने शोकाकूल झाले धर्मेंद, म्हणाले - 'तू ही निघून गेलास, एकामागून एक धक्का...' 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास जगदीप यांचे मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.

ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेते धर्मेंद्र यांनाही जगदीप यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. 

धर्मेंद्र यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरमा भोपाली यांना श्रद्धांजली वाहिली. तू ही निघून गेलास... एकामागून एक धक्का. तुला जन्नत मिळो... अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केला आहेत. 

धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्य 'शोले' या चित्रपटात जगदीप यांनी सुरमा भोपाली ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली होती. यानंतर ते या नावाने ओळखले जाऊ लागले होते.

  • बुधवारी घेतला अखेरचा श्वास

बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास जगदीप यांचे मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. जावेद आणि नावेद  जाफरी यांचे ते वडील होते. त्यांना मुस्कान नावाची एक मुलगीही आहे. 81 वर्षीय जगदीप दीर्घ काळापासून आजारी होते.

  • मध्यप्रदेशात झाला होता जगदीप यांचा जन्म 

जगदीप यांचा जन्म 29 मार्च 1939रो जी मध्यप्रदेशातील दतिया या जिल्ह्यात झाला होता. सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे त्यांचे खरे नाव होते. त्यांनी बी.आर. चोप्रा यांच्या अफसाना या चित्रपटापासून बालकलाकार म्हणून भूमिका साकारण्यास सुरूवात केली होती.  

सुमारे 400 चित्रपटांमध्ये झळकलेल्या जगदीप यांनी बिमल रॉय यांच्या दो बीघा जमीन या चित्रपटाद्वारे विनोदी भूमिका साकारण्यास सुरूवात केली होती. गेली अनेक वर्षे ते बॉलिवूडमध्ये कार्यरत होते. त्यानंतर ते 'ब्रह्मचारी', 'नागिन', 'आर पार', 'हम पंछी एक डाल के', 'दिल्ली दूर नहीं' आणि 'अंदाज अपना अपना'सह अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका साकारताना दिसले. विनोदी व्यक्तिरेखांसोबतच त्यांनी रामसे ब्रदर्सच्या पुराना मंदिर आणि सामरी या हॉरर चित्रपटांमध्येही काम केले. जगदीप यांनी पाच चित्रपटांमध्ये लीड रोल साकारला होता. यामध्ये 'बिंदिया', बरखा' आणि 'भाभी' या चित्रपटांचा समावेश आहे. 

0