आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता सनी देओल यांचा थोरला मुलगा करण देओल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. करण येत्या जूनमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. विशेष म्हणजे नुकताच त्याचा साखरपुडा झाला आहे. करणने दिवंगत फिल्ममेकर बिमल रॉय यांची पणती द्रिशाशी साखरपुडा केल्याची चर्चा सुरू आहे.
पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, मंगळवारी धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्या लग्नाचा 43 वा वाढदिवस होता. याच दिवशी करण आणि द्रिशा यांचा साखरपुडा झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघे बऱ्याच कालावधीपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता साखरपुड्यानंतर दोघे पुढच्या महिन्यात बोहल्यावर चढणार आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या लग्नसोहळ्याला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. मात्र, अद्याप देओल कुटुंबीयांकडून या बातमीला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.
करणने 2019 मध्ये अभिनय क्षेत्रात केले पदार्पण
करण देओलने 2019 मध्ये सनी देओल दिग्दर्शित 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. याशिवाय त्याने 'यमला पगला दिवाना' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. लवकरच करण आजोबा धर्मेंद्र, वडील सनी देओल आणि काका बॉबी देओलसोबत 'अपने-2'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट अनिल शर्मा दिग्दर्शित करणार आहेत.
धर्मेंद्र यांनी वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी केले होते लग्न
धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आहे. त्यांना अजय सिंग (सनी देओल), विजय सिंग (बॉबी देओल) ही दोन मुले आणि विजेता आणि अजिता या दोन मुली आहेत. धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये हेमामालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यांना ईशा आणि आहना या दोन मुली आहेत. सनी देओल यांच्या पत्नीचे नाव पूजा असून दोघांना करण आणि राजवीर ही दोन मुले आहेत. तर बॉबी देओलने त्याची बालपणीची मैत्रीण तान्या आहुजासोबत प्रेमविवाह केला होता. त्यांना आर्यमान आणि धर्म ही दोन मुले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.