आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी देओल बर्थडे स्पेशल:धर्मेंद्र यांनी शेअर केले मुलगा सनी देओलच्या 64 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे इनसाइड फोटो, ट्विट करुन म्हणाले...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धर्मेंद्र यांनी देखील सनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे इनसाइड फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. '

अभिनेता सनी देओलने 19 ऑक्टोबर रोजी आपला 64 वा वाढदिवस साजरा केला. सनीने यंदाचा आपला वाढदिवस वडील धर्मेंद्र, धाकटा भाऊ बॉबी देओल आणि दोन्ही मुले करण आणि राजवीर यांच्यासोबत साजरा केला. इंस्टाग्रामवर वाढदिवसाचा फोटो शेअर करुन सनीने प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी सर्व चाहत्यांचे आभार मानले.

स्वतःचा एक फोटो शेअर करुन सनीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'तुम्ही दिलेल्या भरभरुन प्रेमासाठी तुमचे खूप खूप आभार.'

धर्मेंद्र यांनी देखील सनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे इनसाइड फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. 'सर्वांच्या आशीर्वादाने सनीचा वाढदिवस देओल स्टाइलने साजरा केला. तुमच्या शुभेच्छांची कायमच गरज असते', असे कॅप्शन त्यांनी फोटोसह दिले आहे. धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये सनी, बॉबीसह त्यांची नातवंडे आणि सनीची दोन्ही मुले करण आणि राजवीर दिसत आहेत.

ट्विटरवरदेखील सनीला केक भरवताना फोटो शेअर करुन त्यांनी ट्विट केले, 'तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी तुम्हाला खूप खूप प्रेम. मित्रांनो तुम्ही कायम माझ्या हृद्याजवळ असता. आनंदात... आज तर हद्द झाली ट्विट्सची... तुम्ही बोअर झाला असाल... आता काही दिवस गप्प राहणार', असे त्यांनी म्हटले आहे.

अभिनेता बॉबी देओलनेदेखील थोरल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक इमोशनल नोट लिहिले आहे. भाऊ, वडील आणि मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असे बॉबीने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...