आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या आठवणी:ईशा देओलच्या पाठवणीच्या वेळी खूप रडले होते धर्मेंद्र, पाठवणीचा इमोशनल व्हिडीओ शेअर करुन ईशा म्हणाली -  'आजही हे क्षण बघताना डोळे पाणावतात'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी ईशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर सक्रीय झाले असून ते जुन्या आठवणी शेअर करत आहेत. अभिनेत्री ईशा देओल हिनेदेखील तिच्या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिच्या पाठवणीच्या वेळी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी अतिशय भावूक झालेले दिसत आहेत. 

गुरुवारी ईशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे, यात तिचेही डोळे पाणावलेले दिसत आहेत. वडील धर्मेंद्र यांना बिलगून ती खूप रडतेय. यात धर्मेंद्र यांनाही आपल्या लाडक्या लेकीला निरोप देताना अश्रू अनावर झालेले दिसत आ हेत.

या व्हिडीओत धर्मेंद्र, हेमा आणि धाकटी बहीण अहानासोबत काही नातेवाईक दिसत आहेत.या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर ईशाने आपला आवाज दिला आहे. ती म्हणतेय, मला सहजासहजी रडू येत नाही. पण पाठवणीचा हा व्हिडीओ बघताना मात्र मला अश्रू आवरत नाहीत. जेव्हाही मी हे भावूक क्षण बघते तेव्हा मात्र माझे डोळे पाणावतात. 

2012 मध्ये झाले लग्न: ईशा देओलने 2012 मध्ये उद्योगपती भरत तख्तानीशी लग्न केले. भरत हा तिचा बालपणीचा मित्र आहे. राध्या आणि मिराया ही त्यांचा मुलींची नावे आहेत. 

बातम्या आणखी आहेत...