आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शेतकरी कायद्यांच्या विरोधात 13 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीला चहूबाजुंनी घेरले आहे. आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनावर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे त्यांचा थोरला मुलगा आणि खासदार सनी देओल यांनी याविषयावर भाष्य करताना म्हटले होते की, संपूर्ण जगाला माझी विनंती आहे, हा मुद्दा शेतकरी आणि आपल्या सरकारमधील आहे. यामध्ये कोणी पडू नये. कारण आपापसातील चर्चेतून यावर आम्ही तोडगा काढू. तर दुसरीकडे धर्मेंद्र यांनी शेतक-यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आवाहन केले आहे.
'देशभरात अनागोंदी माजली आहे, वाढदिवस कसा साजरा करु'
आपल्या 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना धर्मेंद्र म्हणाले, लोक कोरोनाव्हायरसला विसरले आहेत. देशभरात अनागोंदी माजली आहे. अशा परिस्थितीत मी वाढदिवस कसा साजरा करु? आपण सर्व भारत मातेची मुलं आहोत. मानवतेपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही. शेतक-यांना काय म्हणायचे आहे ते एकदा ऐका. थंडीच्या दिवसात ते रस्त्यावर बसले आहेत. परस्पर संवादातून यावर तोडगा काढला जाऊ शकतो", असे ते म्हणाले आहेत.
सोशल मीडियावर राग व्यक्त केला जातो
धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी एक पोस्ट टाकली होती. मात्र, लोकांनी या पोस्टचा चुकीचा अर्थ लावून त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली होती. या डिलीट केलेल्या पोस्टविषयी बोलताना धर्मेंद्र म्हणाले, ‘मला फक्त असे म्हणायचे होते की, एकदा शेतकऱ्यांचे ऐका. मी नेहमी सकारात्मक बोलतो पण, लोक त्याचा चुकीचा अर्थ लावतात. सोशल मीडियावर राग व्यक्त केला जात आहे. आता मी स्वत:ला त्यापासून दूर ठेवेल. कारण यातून लोकांची मन दुखावत आहेत.'
धर्मेंद्र यांनी आपल्या डिलीट केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते, ‘सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढावा, देशात कोरोना प्रकरणे वाढत आहेत’, अशा आशयाची ही पोस्ट होती.
शेतकरी आंदोलनावर सनी देओल काय म्हणाले?
अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओल पहिल्यांदाच सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाविषयी एक पोस्ट करत व्यक्त झाले. ‘मी शेतकऱ्यांसोबत आहे’, असे म्हणत सनी देओल यांनी एक मोठी पोस्ट शेअर केली. 'संपूर्ण जगाला माझी विनंती आहे, हा मुद्दा शेतकरी आणि आपल्या सरकारमधील आहे. यामध्ये कोणी पडू नये. कारण आपापसातील चर्चेतून यावर आम्ही तोडगा काढू', असे सनी देओल म्हणालेत.
— Sunny Deol (@iamsunnydeol) December 6, 2020
आपल्या पोस्टमध्ये पुढे त्यांनी म्हटले, 'अनेकांना या आंदोलनाचा फायदा उचलायचा आहे आणि ते त्यात अडथळे आणत आहेत. ते शेतकर्यांचा अजिबात विचार करत नाहीए. यात त्यांचा स्वार्थही असू शकतो. निवडणुकीच्या वेळी दीप सिद्धू माझ्यासोबत होता. आता बराच कालावधीपासून सोबत नाहीये. तो जे काही बोलतोय आणि करतोय ते त्याच्या इच्छेनुसार करतोय. त्याच्या कोणत्याही उपक्रमांशी माझा संबंध नाही. मी माझा पक्ष आणि शेतकऱ्यांसोबत आहे आणि नेहमीच शेतकऱ्यांच्यासोबत राहणार. आमच्या सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या भल्याच्या विचार केला आहे आणि सरकार त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णयावर येईल याची मला खात्री आहे', असे सनी देओल म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.