आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीया मिर्झाने दिला मुलाला जन्म:दीया मिर्झा आई झाली, सोशल मीडियावर लिहिले - 'दोन महिन्यांपूर्वी झाली प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, मुलगा अद्यापही ICU मध्ये आहे'

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रीमॅच्युअर आहे बाळ

अभिनेत्री दीया मिर्झा आई झाली आहे. तिने मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी स्वतः दीयाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे. मात्र तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली असून अद्याप तिचे बाळ आयसीयूत आहे. दीयाने सांगितल्यानुसार, तिने 14 मे 2021 रोजी मुलाला जन्म दिला. ठराविक वेळेच्या दोन महिन्याआधी तिच्या बाळाचा जन्म झाला आहे. अव्यान आझाद रेखी असे तिच्या बाळाचे नाव आहे.

प्रीमॅच्युअर आहे बाळ
दीयाने सोशल मीडियावर आपल्या मुलाच्या जन्माशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. दीयाने सांगितल्यानुसार, तिचा मुलगा अव्यान हा प्रीमॅच्युअर बाळ आहे. जन्मापासून ते नियोनॅटल आईसीयूमध्ये दाखल आहे. दियाने सांगितले की, गर्भधारणेत काही कॉम्प्लिकेशन आल्याने आणि बॅक्टेरियल संसर्गामुळे बाळाचा जीव धोक्यात होता. त्यामुळे डॉक्टरांनी तत्काळ सी-सेक्शनद्वारे प्रसुती करण्याचा सल्ला दिला. मुलगा अव्यानला आता घरी घेऊन जाण्यास दीया आणि तिचे कुटुंबीय आतुर आहेत. दीयाने पुढे लिहिले की, त्याची बहीण समायरा आणि आजीआजोबा बाळाला आपल्या कुशीत घेण्यास खूप आतूर झाले आहेत.

वैभव रेखीसोबत दीयाने थाटले दुसरे लग्न
दीयाने यावर्षी 15 फेब्रुवारी रोजी वैभव रेखी या बिझनेसमनसोबत लग्न केले होते. लग्नात दोघांचेही नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. दीया आणि वैभव दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. दीया आणि वैभव यांचे हे दुसरे लग्न आहे. दीयाचे पहिले लग्न बिझनेसमन साहिल संघासोबत झाले होते. ऑक्टोबर 2014 मध्ये दोघांनी दिल्लीत आर्य-समाजात अगदी साध्या पद्धतीने लग्न केले होते. दीया आणि साहिल लग्नापूर्वी 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले होते. मात्र 2019 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता.

दीया प्रमाणेच वैभवचेही पहिले लग्न झाले होते. आणि पहिल्या लग्नापासून त्याला एक मुलगी असून समायरा हे तिचे नाव आहे. योगा आणि लाइफस्टाइल कोच सुनैना रेखीसोबत वैभवचे पहिले लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या काही वर्षांतच दोघे विभक्त झाले. वैभव हा एक प्रसिद्ध व्यावसायिक असून मुंबईतील पाली हिल परिसरात राहतो.

लग्नाच्या दीड महिन्यानंतर हनीमूनसाठी मालदीवमध्ये गेलेल्या दीयानेही प्रेग्नेंसीबद्दल खुलासा केला होता. यावेळी तिने बेबी बंपसोबतचे फोटोदेखील शेअर केले होते.

दीया मिर्झाचे फिल्मी करिअर
दीयाने 2000 मध्ये मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी केला होता. त्यानंतर तिने 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. दीया शेवटची तापसी पन्नू स्टारर 'थप्पड'मध्ये झळकली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा होते. यापूर्वी दीयानेही 2019 मध्ये डिजिटल डेब्यू केला होता. 'काफिर' या वेब शोमध्ये तिने कनाझ अख्तरची भूमिका साकारली होती.

बातम्या आणखी आहेत...