आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुड न्यूज:लग्नाच्या दीड महिन्यानंतर दीया मिर्झाने दिली गोड बातमी, फोटो शेअर करत म्हणाली - 'माझ्या गर्भात एक सुंदर स्वप्न वाढत आहे'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • याचवर्षी दीया वैभव रेखीसोबत विवाहबद्ध झाली.

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा लवकरच आई होणार आहे. दीयाने बेबी बंपसोबतचा आपला एक फोटो शेअर करत ही गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विशेष म्हणजे दीयाने याचवर्षी फेब्रुवारीमध्ये बिझनेसमन वैभव रेखीशी दुसरे लग्न केले होते. अलीकडेच त्यांचे मालवदीवमधील हनिमूनचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दीया मालदीवमध्ये पती आणि सावत्र मुलगी समायरासोबत सुटी एन्जॉय करत आहे.

दीयाने लिहिली भावनिक नोट
दीयाने मालदीवमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती सूर्यास्त बघताना दिसतेय. अंगाई, गोष्टी, गाणी अशा सगळ्या गोष्टींची लवकरच सुरुवात होणार असल्याचे तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबतच माझ्या गर्भात एक सुंदर स्वप्न वाढत आहे अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.

दीया मिर्झाची चित्रपट कारकीर्द
दीयाने 2000 मध्ये मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा मान पटकावला. त्यानंतर तिने 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. अलीकडेच ती 'धप्पड' या चित्रपटात तापसी पन्नूसोबत दिसली होती. सध्या ती 'वाइल्ड डॉग' या तेलुगू चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.

बातम्या आणखी आहेत...