आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Dia Mirza Marries Her Bf After Two Years Of Devorce From First Husband, These Celebs Have Also Settled In Second House After First Failed Marriage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड सेलेब्सचे दुसरे लग्न:दीया मिर्झाने घटस्फोटाच्या दोन वर्षांनी थाटला दुसरा संसार, या सेलिब्रिटींनीही घटस्फोटानंतर पुन्हा बांधली दुसरी लग्नगाठ

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक सेलिब्रिटींनी त्यांचा पहिला संसार मोडल्यानंतर दुसरा संसार थाटला.

बॉलिवूड दीवा दीया मिर्झाने 15 फेब्रुवारी रोजी बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्न केले. दीयाचे हे दुसरे लग्न आहे. 2014 मध्ये तिने तिचा बिझनेस पार्टनर साहिल संघासोबत लग्न केले होते. मात्र 2019 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. दीया आणि साहिलपूर्वीही बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्यांनी ऐकमेकांमध्ये खटके उडाल्याने घटस्फोट घेतला. यापैकी काहींनी पहिला संसार मोडल्यानंतर दुसरा संसार थाटला. आणि आज ते सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. एक नजर टाकुयात या सेलिब्रिटींवर...

सैफ अली खान - करीना कपूर खान
अभिनेता सैफ अली खानने 1991 मध्ये त्याच्यापेक्षा वयाने 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंहसोबत कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध लग्न केले होते. दोघांनाही सारा आणि इब्राहिम नावाची दोन मुले झाली. मात्र, लग्नाच्या 13 वर्षानंतर 2004 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अमृताने पुन्हा लग्न केले नाही पण सैफने दुसऱ्यांदा करीना कपूरसोबत लग्नगाठ बांधली. दोघांचा एक चार वर्षांचा मुलगा असून लवकरच करीना दुस-यांदा आई होणार आहे.

आमिर खान - किरण राव
कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध रीना आणि आमिर खानने 1986 मध्ये लग्न केले. 16 वर्षे ते एकत्र राहिले. यादरम्यान त्यांना दोन मुले (इरा आणि जुनैद) झाली. पण 2002 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर आमिरने 2005 मध्ये किरण रावशी लग्न केले. 2011 मध्ये किरण सरोगसीच्या माध्यमातून आई झाली. आझाद राव खान हे किरण आणि आमिरच्या मुलाचे नाव आहे.

अर्जुन रामपाल - गॅब्रिएला डेमेट्रिएड्स

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने 1998 साली माजी मिस इंडिया आणि सुपर मॉडेल मेहर जेसियाशी लग्न केले होते. त्यांना दोन मुली आहेत. लग्नाच्या 20 वर्षानंतर 2018 मध्ये दोघांनी विभक्त होण्याची घोषणा केली, त्यानंतर 2019 मध्ये वांद्रे फॅमिली कोर्टातून त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या आधीच एप्रिल महिन्यात अर्जुनने त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला त्याच्या बाळाची आई होणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानंतर जुलैमध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला होता.

संजय दत्त - मान्यता दत्त

संजय दत्तचे वैयक्तिक आयुष्य बर्‍याच कारणांमुळे चर्चेत आले आहे, त्याचे एक कारण म्हणजे त्याच्या रिलेशनशिप. अभिनेत्री टीना मुनिमसोबत ब्रेकअप झाल्यानंतर संजय दत्तने 1987 मध्ये अभिनेत्री रिचा शर्माशी लग्न केले. त्यांना एक मुलगी असून त्रिशाला दत्त तिचे नाव आहे. 1996 मध्ये रिचाचा ब्रेन ट्यूमरमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर संजयने मॉडेल रिया पिल्लईसोबत लग्न केले. पण दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि 2008 त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर संजयने गोव्यात रजिस्टर पद्धतीने मान्यता दत्तशी लग्न केले. त्यांना जुळी मुले आहेत.

कल्कि कोचलिन - गाई हर्शबर्ग
अभिनेत्री कल्कि कोचलिनने 2011 दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्न केले होते. मात्र 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 2019 मध्ये कल्किने तिचा बॉयफ्रेंड गाई हर्शबर्गच्या बाळाची आई होणार असल्याची घोषणा केली होती. 7 फेब्रुवारी 2020 रोजी कल्किलने बाळाला जन्म दिला.

करणसिंह ग्रोव्हर - बिपाशा बासू

करणसिंह ग्रोव्हरने तीन लग्न केली. पहिला विवाह 2008 मध्ये श्रद्धा निगमसोबत तर दुसरे लग्न जेनिफर विंगेट 2012 मध्ये झाले. पण ही दोन्ही लग्न टिकली नाहीत. त्यानंतर करणने 2016 मध्ये बिपाशा बासूशी लग्न केले. दोघेही आता सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत.