आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीया मिर्झाच्या भाचीचा रस्ता अपघातात मृत्यू:अभिनेत्री म्हणाली - माझ्या बाळा, तू नेहमी आमच्या हृदयात राहशील

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीयाने तान्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीयाची भाची तान्या काकडे हिचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. दीया तिच्या भाचीच्या खूप जवळ होती. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तान्याचा फोटो शेअर करून भावनिक नोट लिहिली आहे. दोघींचे खूप चांगले बाँडिंग होते. यासोबतच तान्यासुद्धा दीया तिची प्रेरणा मानत होती.

तू आमच्या हृदयात राहशील- दिया
दीयाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले- "माझी भाची.. माझं बाळ.. माझे आयुष्य आता या जगात नाही. तू कुठेही असशील, तुला शांती आणि प्रेम मिळो. तू सदैव आमच्या सर्वांच्या हृदयात राहशील. तू नेहमीच आम्हाला हसवलंस. तू जिथे असशील तिथे तुझं नाचणं, हसणं आणि गाण्याने आनंद बहरेल. ओम शांती," अशा शब्दांत दीयाने तान्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

दीयाच्या या पोस्टवर इंडस्ट्रीतील तिचे मित्र आणि चाहते श्रद्धांजली वाहत आहेत. बोमन इराणी यांनी लिहिले की, दीया ही अत्यंत हृदयद्रावक बातमी आहे. रिद्धिमा कपूर साहनी आणि सुनील शेट्टी यांनी कमेंटमध्ये हात जोडलेले इमोजी पोस्ट केले, तर गौहर खानने तुटलेल्या हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. सुझान खानची बहीण फराह हिने कमेंटमध्ये लिहिले, 'ही खूप दुःखद बातमी आहे, तू जिथे असशील तिथे चमकत राहा,' अशा शब्दांत तिने श्रद्धांजली वाहिली आहे.

तान्याचा अपघाती झाला मृत्यू
सियासत डॉटकॉमनुसार, काँग्रेस नेते फिरोज खान यांची सावत्र मुलगी तान्या तिच्या मित्रांसह राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हैदराबादला जात होती. विमानतळाकडे जाताना त्यांची कार दुभाजकावर आदळल्याने चौघेही जखमी झाले. रिपोर्टनुसार तान्याचा जागीच मृत्यू झाला. तिचा मृतदेह उस्मानिया रुग्णालयात नेण्यात आला आणि तिच्या कुटुंबीयांना अपघाताबद्दल कळवण्यात आले. त्याचवेळी, तिच्या उर्वरित मित्रांना विमानतळ पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

बातम्या आणखी आहेत...