आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीया मिर्झाचे दुसरे लग्न:बिझनेसमन वैभव रेखीसोबत हिंदू पद्धतीने विवाहबद्ध झाली दीया, लग्नात कुटुंबीयांसह जवळचे मित्र झाले सहभागी

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीयाने फोटोग्राफर्सना मिठाई वाटली.

माजी मिस एशिया पॅसिफिक आणि अभिनेत्री दीया मिर्झा सोमवारी बिझनेसमन वैभव रेखीसोबत विवाहबद्ध झाली. दीयाच्या मुंबईस्थित घरीच अतिशय साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला दोघांच्या कुटुंबीयांसह जवळचे मित्र सहभागी झाले होते. लग्नाच्या विधी पूर्ण झाल्यानंतर दीया आणि वैभव यांनी बाहेर येऊन फोटोग्राफर्सना पोज दिली. यावेळी दीयाने फोटोग्राफर्सना मिठाईदेखील वाटली. यावेळी दीया लाल रंगाच्या पारंपरिक साडीत दिसली, तर वैभव पांढ-या कुर्ता पायजामासह नेहरु जॅकेटमध्ये दिसला.

दीयाने सोमवारी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले होते. तिने शेअर केलेला पहिला फोटो तिच्या मेहंदी सेरेमनीचा होता. यासोबतच तिच्या ब्राइड टू बी सेरेमनीचेही काही फोटो तिने शेअर केले होते. यात ती ए लाइन ड्रेसमध्ये दिसली होती.

दीया आणि वैभव यांचे दुसरे लग्न
दीया आणि वैभव यांचे हे दुसरे लग्न आहे. दीयाचे पहिले लग्न बिझनेसमन साहिल संघासोबत झाले होते. ऑक्टोबर 2014 मध्ये दोघांनी दिल्लीत आर्य-समाजात अगदी साधा पद्धतीने लग्न केले होते. दीया आणि साहिल लग्नापूर्वी 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले होते. मात्र 2019 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता.

दीया प्रमाणेच वैभवचेही पहिले लग्न झाले होते. आणि पहिल्या लग्नापासून त्याला एक मुलगी आहे. योगा आणि लाइफस्टाइल कोच सुनैना रेखीसोबत वैभवचे पहिले लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या काही वर्षांतच दोघे विभक्त झाले. वैभव हा एक प्रसिद्ध व्यावसायिक असून मुंबईतील पाली हिल परिसरात राहतो.

'थप्पड' होता शेवटचा चित्रपट
दीयाचा तापसी पन्नू स्टारर 'थप्पड'मध्ये झळकली होती. या चित्रपटात तिने शिवानी नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा होते. यापूर्वी दीयानेही 2019 मध्ये डिजिटल डेब्यू केला होता. 'काफिर' या वेब शोमध्ये तिने कनाझ अख्तरची भूमिका साकारली होती.