आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा 15 फेब्रुवारी रोजी बिझनेसमन वैभव रेखीसोबत विवाहबद्ध झाली. दीयाच्या मुंबईतील राहत्या घरी हा लग्नसोहळा संपन्न झाला. या लग्नाला दीया आणि वैभवच्या कुटुंबीयांसह मोजके मित्र उपस्थित होते. लग्नानंतर दीयाने लग्नाचे काही फोटो सोशल मीडिया अकाउटंवर शेअर केले आहेत.
हिंदू पद्धतीने वैभव आणि दीयाचे लग्न झाले. लग्नात दीयाने लाल रंगाची भरजरी साडी नेसली होती. नववधूच्या रुपात दीयाचे सौंदर्य आणखीनच फुलून आले होते. तर वैभवने पांढ-या रंगाच्या कुर्ता पायजामासह नेहरु जॅकेट घातले होते.
विशेष म्हणजे दीया आणि वैभव या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. योगा आणि लाइफस्टाइल कोच सुनैना रेखीसोबत वैभवचे पहिले लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या काही वर्षांतच दोघे विभक्त झाले. वैभव हा एक प्रसिद्ध व्यावसायिक असून मुंबईतील पाली हिल परिसरात राहतो. पहिल्या लग्नापासून वैभवला एक मुलगी आहे.
लॉकडाऊनच्या काळात दीया आणि वैभव जवळ आले आणि आता त्यांनी आपल्या मैत्रीचे रुपांतर लग्नात केले आहे.
दीयाचे पहिले लग्न बिझनेसमन साहिल संघासोबत झाले होते. ऑक्टोबर 2014 मध्ये दोघांनी दिल्लीत आर्य-समाजात अगदी साधा पद्धतीने लग्न केले होते. दीया आणि साहिल लग्नापूर्वी 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले होते. मात्र 2019 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता.
लग्नाच्या विधी पूर्ण झाल्यानंतर दीया आणि वैभव यांनी बाहेर येऊन फोटोग्राफर्सना पोज दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.