आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनोखा विवाह:दीया मिर्झाने शेअर केली लग्नाची कहाणी, सांगितले - आमच्या लग्नात कन्यादान आणि पाठवणी हे दोन पारंपरिक विधी टाळण्यात आले

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्नात कन्यादान आणि पाठवणी हे दोन पारंपरिक विधी टाळण्यात आल्याचे दीयाने सांगितले आहे.

दीया मिर्झा सध्या आपल्या लग्नामुळे चर्चेत आहे. बिझनेसमन वैभव रेखीसोबत दीया 15 फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध झाली. दीया आणि वैभव यांचे हे दुसरे लग्न आहे. विशेष म्हणजे दीयाच्या लग्नाच पुरुष पुजारी नव्हे तर महिला पुजारीने लग्नाचे सर्व विधी केले होते. आता दीयाने लग्नातील एक फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. लग्नात कन्यादान आणि पाठवणी हे दोन पारंपरिक विधी टाळण्यात आल्याचे तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे. सोबतच लग्नात डेकोरेशन पासून ते सामग्री पर्यंत वापरण्यात आलेल्या सगळ्या वस्तू या इकोफ्रेंडली होत्या त्यात कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक किंवा थर्माकॉल वापरण्यात आले नसल्याचे ती म्हणाली आहे. याशिवाय तिने महिला पुजारी शीला अत्ता यांच्याविषयीदेखील सांगितले आहे.

बालपणीच्या मैत्रीणीच्या काकू आहेत शीला अत्ता

दियाने आपल्या पोस्टमध्ये सांगितल्यानुसार, महिला पुजारी शीला अत्ता या तिची बालमैत्रीण अनन्याच्या नातेवाईक आहेत. 'मी अनन्याच्या लग्नापर्यंत कोणत्याही महिला पुजारीला लग्नाच्या विधी करताना पाहिले नव्हते. अनन्याने आमच्या लग्नात शीला अत्ता यांना लग्नविधी करण्यासाठी आणले. ही तिच्याकडून आम्हाला मिळालेली लग्नाची अतिशय मौल्यवान भेट आहे. इतर जोडपीदेखील याचे अनुकरण करतील, अशी आशा करते,' असे दीया म्हणाली आहे. आपल्या आजुबाजूला होणाऱ्या बदलांची सुरुवात आपण केलेल्या निवडीपासूनच होते, असे दीयाने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...