आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलिब्रिटी वेडिंग:आज बिझनेसमन वैभव रेखीसोबत दुस-यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार दीया मिर्झा, शाहरुखच्या मॅनेजरने शेअर केला प्री-वेडिंग बॅशचा फोटो

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिया मिर्झा आज दुस-यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस एशिया पॅसिफिस इंटरनॅशनल दिया मिर्झा आज दुस-यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बिझनेसमन वैभव रेखीसोबत दीया नवीन आयुष्याला सुरुवात करतेय. तत्पूर्वी शनिवारी त्यांच्या प्री वेडिंग बॅशचे आयोजन करण्यात आले होते. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने पार्टीचा एक फोटो शेअर करत दीयाचे कुटुंबात स्वागत केले आहे. दीयानेदेखील या फोटोवर हृदयाचा इमोजी बनवून प्रतिक्रिया दिली.

पूजाने केले दीयाचे कुटुंबात स्वागत
पूजाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शनिवारी झालेल्या गेट टू गेदरचे काही फोटोज शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'आमच्या क्रेझी फॅमिलीत तुझे स्वागत आहे. आम्हा सर्वांचे तुझ्यावर खूप प्रेम आहे.'

साध्या पद्धतीने होतोय विवाहसोहळा
मुंबईत दोघांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नात संगीत सेरमनीसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले नाहीत. अतिशय साध्या पद्धतीने दोघे विवाहबद्ध होतील. लग्नानंतर दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्र मैत्रिणींसाठी गेट-टु-गेदरचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दीया आणि वैभव यांचे दुसरे लग्न
दीया आणि वैभव यांचे हे दुसरे लग्न आहे. दीयाचे पहिले लग्न बिझनेसमन साहिल संघासोबत झाले होते. ऑक्टोबर 2014 मध्ये दोघांनी दिल्लीत आर्य-समाजात अगदी साधा पद्धतीने लग्न केले होते. दीया आणि साहिल लग्नापूर्वी 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले होते. मात्र 2019 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता.

साहिलपासून विभक्त झाल्यानंतर दीया म्हणाली होती की, एक सेलिब्रिटी असल्यामुळे माझे प्रोफेशन मला दु:खी राहण्याची परवानगी देत नाही आणि हे दु:ख सहन करण्याची ताकद मला माझ्या आई-वडिलांकडून मिळाली आहे. मी चार वर्षांची असताना माझे आई-वडील विभक्त झाले. आज या घटनेला 34 वर्षे झाली. जर चार वर्षांची असताना मी हे दु:ख सहन करु शकते तर वयाच्या 37 व्या वर्षी का नाही?, असे दिया म्हणाली होती.

पहिल्या लग्नापासून वैभव रेखीला आहे एक मुलगी
दीया प्रमाणेच वैभवचेही पहिले लग्न झाले होते. आणि पहिल्या लग्नापासून त्याला एक मुलगी आहे. योगा आणि लाइफस्टाइल कोच सुनैना रेखीसोबत वैभवचे पहिले लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या काही वर्षांतच दोघे विभक्त झाले. वैभव हा एक प्रसिद्ध व्यावसायिक असून मुंबईतील पाली हिल परिसरात राहतो.

गेल्या वर्षीपासून दीया आणि वैभव एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. आता हे दोघे आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...