आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीयाची काळजी:गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत आहे दीया मिर्झा, म्हणाली - डॉक्टरांनी देशात सध्या दिली जाणारी कोरोना लस घेऊ शकत नसल्याचे सांगितले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात गर्भवती महिलांवर क्लिनिकल चाचण्या झालेल्या नाहीत

अभिनेत्री दीया मिर्झा लवकरच आई होणार आहे. दीया सध्या गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत आहे. याकाळात कोरोना लसीचा डोस घेऊ शकत नसल्याचे तिने सांगितले आहे. दीयाने सांगितले की, भारतात सध्या देण्यात येणा-या कोरोना लसीची चाचणी ही गर्भवती महिला आणि स्तनपान करणा-या मातांवर करण्यात आलेली नाही. म्हणूनच तिच्या डॉक्टरांनी तिला लस न घेण्याचा सल्ला दिला आहे. दीयाचे लग्न फेब्रुवारी 2021 मध्ये व्यावसायिक वैभव रेखीबरोबर झाले आहे.

भारतात गर्भवती महिलांवर क्लिनिकल चाचण्या झालेल्या नाहीत
दीयाने एका ट्विटर यूजरला उत्तर देताना लिहिले - हे खूप महत्वाचे आहे. नक्की वाचा आणि हे देखील लक्षात घ्या की, सध्या भारतात दिल्या जाणा-या कोरोना लसीच्या चाचण्या गर्भवती आणि स्तनपान करणा-या मातांवर झालेल्या नाहीत. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, जोपर्यंत आवश्यक क्लिनिकल चाचण्या होत नाही, तोपर्यंत लसीचा डोस घेता येऊ शकत नाही.

भारतातील लसीकरणाची सद्यस्थिती
सध्या देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे. यात 18 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. 12 मेपर्यंत एकुण 17 कोटी 51 लाख 71 हजार 482 लोकांचे लसीकरण झालेले आहे. याकाळात एकुण 13 कोटी 65 लाखांहून अधिक लोकांना पहिला डोस आणि 3 कोटी 85 लाखांहून अधिका जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. देशात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन कोरोना लसी देण्यात येत आहेत.

दीया मिर्झाची चित्रपट कारकीर्द
दीयाने 2000 मध्ये मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी केला होता. त्यानंतर तिने 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. आपल्या अभिनयामुळे तिने चाहत्यांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. ती शेवटची तापसी पन्नू स्टारर 'थप्पड' या चित्रपटात दिसली होती. सध्या तिच्याकडे 'वाइल्ड डॉग' हा तेलुगू चित्रपट आहे.

बातम्या आणखी आहेत...