आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा 15 फेब्रुवारी रोजी दुस-यांदा लग्न करत आहे. मुंबईतील बिझनेसमन वैभव रेखीसोबत दीया विवाहबद्ध होणार आहे. दीयासोबतच वैभवचेही हे दुसरे लग्न आहे. दीयाचे पहिले लग्न बिझनेसमन साहिल संघासोबत झाले होते. मात्र 2019 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. लग्न तुटल्यानंतर एका मुलाखतीत दीया तिच्या वैयक्तिक आयुष्यावर मनमोकळेपणाने बोलली होती.
साहिलसोबतचे संबंध संपुष्टात आले तेव्हा दीया म्हणाली होते, 'प्रत्येकवेळी माझ्याबद्दलच का लिहिलं जातं. मी नवऱ्यापासून वेगळे झाले. आता मला वाटतं की तुम्ही पुढे जायला हवं. एक अभिनेत्री म्हणून या सर्व गोष्टींमुळे मी दुःखी व्हावं हे काही योग्य नाही. जेव्हा मी चार वर्षांची होते तेव्हा माझ्या आई बाबांचा घटस्फोट झाला होता. तेव्हा मी हिंमत दाखवली होती. आता तर मी 37 वर्षांची आहे. तर माझ्यासाठी ही गोष्ट कशी काय कठीण असेल,' असे दीया म्हणाली होती.
दीया-साहिलचे नाते 11 वर्षे टिकले
दीयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत साहिलपासून विभक्त होत असल्याचे सांगितले होते. तिने पोस्टमध्ये लिहिले होते, 'आयुष्याची 11 वर्षे एकत्र घालवल्यानंतर आम्ही परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही मित्र होतो आणि हे संबंध प्रेम व आदराने एकमेकांशी सुरूच ठेवत आहोत. आमचा प्रवास आम्हाला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाईल, परंतु आम्ही शेअर केलेल्या नात्याबद्दल एकमेकांचे नेहमी आभारी आहोत. आम्ही आमच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे त्यांच्या प्रेमाबद्दल आणि माध्यमांना त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानू इच्छितो आणि सर्वांना विनंती करतो की आम्हाला आमचा वेळ द्या. या प्रकरणात आम्ही पुढे काही बोलणार नाही.'
2014 मध्ये झाले होते लग्न
दीयाचे 18 ऑक्टोबर 2014 रोजी साहिलशी लग्न झाले होते. साहिल हा त्यावेळी तिचा बिझनेस पार्टनर होता. दीया आणि साहिलचे दिल्लीत आर्य समाजात लग्न झाले होते. दीया आणि साहिल यांचे लग्न पाच वर्ष टिकले होते. मात्र त्यापूर्वी दोघे सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.
'थप्पड' होता शेवटचा चित्रपट
दीयाचा तापसी पन्नू स्टारर 'थप्पड'मध्ये झळकली होती. या चित्रपटात तिने शिवानी नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा होते. यापूर्वी दीयानेही 2019 मध्ये डिजिटल डेब्यू केला होता. 'काफिर' या वेब शोमध्ये तिने कनाझ अख्तरची भूमिका साकारली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.