आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री दीया मिर्झाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. दीयाने शेअर केलेला पहिला फोटो तिच्या मेहंदी सेरेमनीचा आहे. यासोबतच तिच्या ब्राइड टू बी सेरेमनीचेही काही फोटो शेअर केले आहेत. यात ती ए लाइन ड्रेसमध्ये दिसतेय. आज तिचे लग्न असून थोड्याच वेळात ती बिझनेसमन वैभव रेखीसोबत विवाहबद्ध होणार आहे. दीयाचे नववधूचे रूप बघण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
दीयाचे लग्न आज (15 फेब्रुवारी) होणार आहे
दीया आज (15 फेब्रुवारी) रोजी व्यावसायिका वैभव रेखाशी लग्न करणार आहे. हे दोघे बर्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. वैभव हा मुंबई येथील व्यावसायिक असून वांद्रे येथील पाली हिल भागात राहतो. वृत्तानुसार वैभवची पहिली पत्नी योगा आणि लाइफस्टाइळ कोच सुनैना रेखा होती आणि त्यांना एक मुलगीही आहे. असे म्हटले जाते की, दीया आणि वैभव हे लॉकडाउनच्या काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि तेव्हापासून दीया वैभवसोबत त्याच्या पाली हिलस्थित घरी राहतेय.
लग्नात मर्यादित पाहुणे राहणार उपस्थित
दीया मिर्झाच्या इमारतीच्या बाहेरही एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये इमारतीचे गेट सजलेले दिसत आहे. दीयाचे लग्न हा खासगी सोहळा आहे. समारंभ आणि लग्नाच्या कार्यक्रमात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित असतील. लग्नाच्या आधी प्री-वेडिंग पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते.
शाहरुखच्या मॅनेजरने दीयाचे कुटुंबात स्वागत केले
शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने शनिवारी प्री-वेडिंग पार्टीचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. फोटो शेअर करताना तिने दीयाचे कुटुंबीत स्वागत केले. पूजाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "आमच्या क्रेझी फॅमिलीमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही सर्व तुझ्यावर प्रेम करतो."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.