आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन अंडर टेकरने रेसलिंगच्या विश्वातून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्याचे चाहते जरा नाराज झाले आहे. दरम्यान अंडरटेकर आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही व्हिडिओ क्लिप अक्षयच्या गाजलेल्या खिलाडियों के खिलाडी या चित्रपटातील एका फाइच सीनची आहे. पण यात अक्षयसोबत फाइट सीन करणारा अंडरटेकर नव्हे तर त्याच्यासारखाच दिसणारा ब्रायन ली असल्याचे तुम्हाला माहित आहे का? ब्रायन ली हा अंडरटेकरचा टेम्पररी रिप्लेसमेंट होता. त्याला 'अंडरटेकर इम्पर्सनेटर' असा टॅग मिळाला होता आणि अशा प्रकारे त्याला बॉलिवूड चित्रपट मिळाला होता.
ब्रायल ली याचे देखील रेसलिंगच्या विश्वात मोठे नाव असून त्याची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. त्याचा चेहरा आणि पर्सनॅलिटी देखील अंडरटेकरसारखीच आहे. अंडरटेकरची उंची 6 फूट 10 इंच तर ब्रायनची उंची 6 फूट 7 इंच इतकी आहे.
अक्षय कुमारने या चित्रपटातील दृश्यात ब्रायन लीला उचलले होते, ज्यामुळे त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. यानंतर काही काळ त्याला रुग्णालयात राहावे लागले होते. हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहेत, ज्यात WWF रेसलर झळकला होता.
अंडरटेकर आणि ब्रायन मित्र होते
आयएमडीबीच्या म्हणण्यानुसार 1993 साली अंडरटेकरच्या लग्नात ब्रायन बेस्ट मॅन होता. मात्र काही वर्षांनी ब्रायन आणि अंडरटेकरची मैत्री वैयक्तिक कारणामुळे तुटली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.