आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडद्यामागील:तुम्हाला माहित आहे का? कोणी दिले नाव... कोण आहे 'बॉलिवूड' शब्दाचा जनक, सर्व दाव्यांवर टाकुयात एक नजर  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बऱ्याच ठिकाणी व्यावसायिक चित्रपट आल्यानंतर उपहासात्मक वापरला जायचा ‘वुड’ शब्द.

‘बॉलिवूड’, हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय नाव आहे. हा शब्द सर्वप्रथम कधी वापरला गेला आणि याचे काय महत्त्व आहे...या शब्दाचे नामकरण कुणी केले, याचाच एक शोध...  

  • पहिला उल्लेख 1932 मध्ये

‘टॉलिवूड’ शब्द 1932 मध्ये पहिल्यांदा वापरला गेला असे मानले जाते. विल्फोर्ड इ. डेमिंग नावाच्या साउंड इंजिनिअरने याचा प्रयोग केला आहे. त्याच्या देखरेखीखाली भारतातील पहिला टॉकी चित्रपट बनवला होता. त्याने ‘अमेरिकन सिनेमेटोग्राफर’ पत्रिकेत या शब्दाचा उल्लेख केला होता.

  • टॉलिवूडमधून आला बॉलिवूड

खरंतर ‘वूड’हा मुंबईपूर्वी कोलकाता चित्रपटसृष्टीने घेतला होता असे मानले जाते. तेथील चित्रपटसृष्टीला टॉलिवूड म्हटले जाते. कारण दक्षिण कोलकातामध्ये ज्या भागात चित्रपटांचे चित्रीकरण होते त्याला टॉलिगंज म्हणतात. यानंतर येथूनच ‘वूड’ शब्द हिंदी चित्रपटसृष्टीसाठी वापरला जाऊ लागला. ‘आनंदलोक’ सारख्या मॅगझीनदेखील या शब्दाचा प्रयोग बंगाली चित्रपटसृष्टीसाठी करत होत्या. तेथूनच हा शब्द लोकप्रिय झाला. जेएस पत्रिका (ज्युनियर स्टेट्समॅन) च्या पत्रकाराने या शब्दाचा सुरुवातीला उपयोग केला होता, असेही म्हटले जाते.

कोणी दिले नाव

  • अमित खन्ना

प्रसिद्ध गीतकार अमित खन्ना यांना ‘बॉलिवूड’ शब्दाचे जनक मानले जाते. 70 च्या दशकात त्यांनी हा शब्द एका कॉलममध्ये लिहिला होता, जो नंतर हिंदी चित्रपटसृष्टीच्या नावाचा पर्याय झाला. खरंतर अमित यांना पॅरलल चित्रपटांचा कोरडेपणा आणि मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या बहुरंगीपणातील फरक या शब्दामधून दाखवायचा होता. त्यांच्या मते हा शब्द हिंदी चित्रपटासाठी एक बाँड नेमचे काम करणार होता, त्यांनी मुंबईचे जुने नाव बंबईच्या ‘बॉम्बे’ आणि हॉलिवूडच्या ‘वूड’ला एकत्र करून हिंदी चित्रपटाचे नामकरण केले ‘बॉलिवूड.’ अमिताभ यांनी अमित यांना फोन करून बॉलिवूड शब्दाप्रती आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, इंडस्ट्रीला हिंदी चित्रपट इंडस्ट्रीच म्हणावे.

  • एचआरएफ किटिंग

प्रसिद्ध गुन्हे/थरारक कादंबरीकार किटिंग यांनादेखील बॉलिवूड शब्दाच्या शोधासाठीचे श्रेय दिले जाते. त्यांच्या गुन्हेगारीवरील कादंबऱ्यांच्या मालिकेत मुंबई सीआयडीचे निरीक्षक घोटे हे मुख्य व्यक्तिरेखा असायचे. 1976 मधील अशाच एका कादंबरीमधील पात्रांतील संभाषणात असा उल्लेख आहे की, ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये सर्वांत मोठी खळबळ माजवणार आहे. बॉलिवूड शब्दाचा इतका स्पष्टपणे वापर केलेले हे पहिले उदाहरण आहे.

  • बेविंडा कोलाको: कॉलममधून आले होते नाव

कोलाको यांना देखील या शब्दासाठी श्रेय दिले जाते. हा शब्द प्रचलित होण्यामागची एक गोष्ट त्यांनी स्वत: सांगितली आहे. ‘मी 1978 ते 1980 दरम्यान ‘सिने ब्लिट्ज’ मॅगझीनमध्ये फिल्म रिपोर्टर होते. जेथे मला एक कॉलमचे काम दिले होते. यात मला चित्रपटांच्या सेटवर काय चालले आहे याची रिपोर्टिंग करावी लागायची. याच कॉलमचे नाव ‘स्टुडिओ बीट’ होते, परंतु हे नाव मला आवडत नव्हते. मला याचे नाव ‘फिलिपिंग अराउंड फॉलिवूड’ ठेवावे असे वाटत होते, परंतु मला हे खूप कोरडे वाटले. म्हणून मी ‘ऑन द बॉलिवूड बीट’ हे नाव ठेवले आणि हे सर्वांनाच आवडले. हाच शब्द आज जगातील भारतीय चित्रपटाचा पर्याय बनला आहे.

रडस्ट मॅगझिन: काही लोकांच्या मते स्टारडस्ट मॅगझिनने या शब्दाचा उपयोग प्रथम त्यांचा कॉलम ‘नीता’ज नेटर’मध्ये मजेशीर पद्धतीने केला होता. या कॉलममध्ये ते देशी-विदेशी सेलेब्सच्या लाइफ स्टाइलवर लिहायचे. 

  • तेलुगू आणि बंगाली दोन्ही इंडस्ट्री आहेत ‘टॉलिवूड’

कोलकाताची बंगाली आणि हैदराबाद येथील तेलुगू चित्रपटसृष्टीला टॉलिवूड म्हटले जाते. तेलुगूच्या ‘T’ मधून टॉलिवूड निघाला आहे. हैदराबादमध्ये अजून एक लहान चित्रपटसृष्टी आहे. जिला डेक्कनवूड म्हटले जाते. येथे दाक्षिणात्य भाषेतील चित्रपट बनवले जातात. कन्नड भाषेतील बंगळुरू चित्रपटसृष्टीला सेंडलवूड म्हटले जाते, कारण कर्नाटक संपूर्ण जगात चंदनासाठी प्रसिद्ध आहे. तामिळ चित्रपटसृष्टीला कॉलिवूड म्हटले जाते, कारण ही ज्या ठिकाणी आहे त्याचे नाव कोदाम्बकम आहे. गुजरात चित्रपटसृष्टीला ढॉलिवूड म्हटले जाते, कारण तेथे गरबासहीत इतर कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त ढोलचा उपयोग केला जातो. नवीन काळात गुजराती चित्रपटात याला उपहासात्मक वापरले जाते.

  • कसे झाले ‘हॉलिवूड’ नामकरण

अमेरिकेत कॅलिफोर्नियातील लॉस एंजेल्सजवळ हॉलिवूड नावाची एक जागा आहे. जेथे अमेरिकन कंपन्यांचे चित्रपट स्टुडिओ आहेत. या 500 एकर जमिनीचा मालक एचजे व्हिटले यांना येथे एक लाकडाचा व्यापारी मिळाला. त्याला त्यांनी विचारले की, तो इथे काय करतो आहे. तो व्यापारी म्हणाला- ‘हाऊलिंग वुड.‘ व्हिटले यांना हा शब्द खूप आवडला. तर त्यांनी या संपूर्ण जागेचे ‘हॉलिवूड’असे नामकरण केले. काहींच्या मते त्या भागात पसरलेल्या ख्रिसमस होळी नावाच्या झुडपामुळे हे नाव प्रसिद्ध झाले आहे. तर काहींचा असा दावा आहे की, हे नाव व्हिटले यांच्या मित्राच्या पत्नीला तिच्या शेजाऱ्याकडून मिळाले होते जो केनियन नाव असलेल्या ठिकाणी राहायचा.

काही नावे: पहारीवूड (उत्तराखंड, ऑलिवूड (ओडिया), भॉलिवूड (भोजपुरी)

बातम्या आणखी आहेत...