आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:सुशांतच्या बायपोलर डिसऑर्डरच्या वृत्तावर संजना म्हणाली - 'दिल बेचारा'च्या शूटिंगदरम्यान कधीच असं वाटलं नव्हतं, तो सेटवर खूपच फोकस्ड असायचा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजना म्हणाली, मला सुशांतच्या आजाराबद्दल काहीच माहित नव्हते

24 जुलै रोजी सुशांत सिंह राजपूत आणि संजना सांघी स्टारर 'दिल बेचारा' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. लीड अॅक्ट्रेस म्हणून संजनाचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. आपला पहिला को-अॅक्टर सुशांतच्या अकाली निधनामुळे संजनालाही मोठा धक्का बसला आहे.

सुशांतने आत्महत्येसारखे पाऊल का उचलले यामागील कारणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पण यासोबतच सुशांतला नैराश्याने ग्रासले असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 40 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत.   नैराश्याने ग्रासलेल्या सुशांतवर 3  मानसोपचार तज्ज्ञ उपचार करत होते. त्यांचाही जबाब नोंदवला गेला आहेत. मनोचिकित्सकांनी पोलिसांना सांगितले की, सुशांतला बायपोलर डिसऑर्डर होता. या वृत्तावर संजनाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • सुशांत सेटवर कधीही स्वमग्न दिसला नाही 

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत संजना म्हणाली, “सुशांतला मी पहिल्यांदा 'दिल बेचारा' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते, त्यामुळे 2015 किंवा 2016 मध्ये आणि सुशांतच्या वागण्यात मला काहीच फरक जाणवला नाही. जेव्हा मी सुशांतबरोबर काम केले तेव्हाच मी त्याला ओळखायला लागले होते. तो मला कधीही स्वमग्न वाटला नाही. कारण तो सेटवर खूप लक्ष देत असे.''

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि तो पाहून कोणीही असे म्हणू शकत नाही की या अभिनेत्याचे मन दुसरीकडे होते. तो  पूर्णपणे त्याच्या पात्रात होता. तो सेटवर खूप सपोर्टिव्ह असायचा, असं संजनाने सांगितले.

संजना पुढे म्हणाली, मी त्याच्याविषयीची बायपोलर डिसऑर्डरसंदर्भातील बातमी वाचलेली नाही. मी मानसशास्त्रज्ञ नाही. एखादी व्यक्ती डिप्रेशन किंवा बायपोलर डिसऑर्डरने त्रस्त असल्याचे काश मला समजू शकले असते. मी मानसिक आरोग्याच्या मुद्याकडे अगदी वेगळ्या प्रकारे पाहतो. मी स्वत: या वेळी एका अतिशय कठीण टप्प्यातून जात आहे, त्यामुळे माझ्यासाठीसुद्धा तितकेसे हे सोपे नाही. मला सुशांतच्या आजाराबद्दल काहीच माहित नव्हते आणि जर त्याने याविषयी कधी काही सांगितले असेल तर आम्ही त्याबद्दल नक्की सांगितले असते, पण त्याने कधीही काहीही सांगितले नाही, असे ती म्हणाली.   

  • बायपोलर डिसऑर्डर म्हणजे मानसिक आजार 

बायपोलर डिसऑर्डर हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये माणसाचे वर्तन वेगाने बदलते. याला मॅनिक डिप्रेशन असेही म्हणतात. यामुळे त्रस्त असलेली व्यक्ती कधीकधी आसपासच्या लोकांवर विश्वास ठेवण नाही.  डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सुशांतचीही तीच स्थिती होती. डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले की, सुशांत कोणत्याही डॉक्टरांना दोन किंवा तीन वेळा भेटायचा आणि नंतर डॉक्टर बदलायचा. कदाचित यामागचे कारण असे होते की त्याचा त्याच्या डॉक्टरांवर विश्वास नव्हता.