आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या केस:'दिल बेचारा'ची अभिनेत्री संजना सांघीवर भडकली कंगना, म्हणाली - जेव्हा सुशांतवर रेपचे आरोप लागत होते तेव्हा त्याच्यासोबतच्या मैत्रीचे किस्से का नाही ऐकवले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांत सिंह राजपूतच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर कंगना रनोट सोशल मीडियावर आपल्या ऑफिशियल टीमच्या माध्यमातून खूप अॅक्टिव्ह आहे. तिने सोशल मीडिया आणि मीडिया मुलाखतींमध्ये नेपोटिज्म, गटबाजी, फेव्हरटिज्म, कँपचा दबदबा याविरोधात मोर्चा उभा केला आहे. 

कंगनाने बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत पंगा घेतला आहे आणइ वाद अजूनही सुरू आहे. याच काळात कंगनाने आता सुशांतची अखेरची को-स्टार संजना सांघीवरही निशाणा साधला आहे. संजनाने सुशांसोबत त्याचा अखेरचा दिल बेचारा चित्रपटात काम केले आहे. जो चित्रपट उद्या म्हणजेच 24 जुलैला ओटीटी प्लेटफॉर्म रिलीज होत आहे.

संजनावर भडकली कंगना 
कंगनाच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर सुशांत आणि संजनावर लिहिलेले जुने आर्टिकलची लिंक शेअर करण्यात आली आहे. या आर्टिकलमध्ये लिहिले होते की, सुशांतच्या एक्स्ट्रा फ्रेंडली बिहेवियरमुळे त्रस्त होऊन संजनाने शूटिंग मध्येच सोडली होती. 

हे आर्टिकल शेअर करत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, अनेक वृत्तांमध्ये दावा करण्यात आला होता की, सुशांतने संजनाचा रेप केला होता, अशा प्रकारच्या बातम्या त्या काळात सामान्य झाल्या होत्या, तेव्हा संजनाला याविषयी बोलण्याची गरज का वाटली नाही? जेव्हा सुशांत जिवंत होता तेव्हा संजनाने त्याच्यासोबतच्या मैत्रीचे किस्से एवढ्या तल्लीनतेने सर्वांना का नाही ऐकवले?@mumbaipolice चौकशी करा.

सुशांतवर लावले होते मीटूचे आरोप 
2018 मध्ये बॉलिवूडमध्ये मीटू मूव्हमेंटची सुरुवात झाली होती, तेव्हा सुशांतही याच्या विळख्यात सापडला होता. अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले होते की, सुशांतने आपली दिल बेचाराची को-स्टार संजना सांघीसोबत वाईट वर्तन आणि तिचे सेक्शुअल हरॅशमेंट केली. 

संजनाने 2018 मध्ये दिले होते स्पष्टीकरण 
यानंतर संजनाने 2018 मध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून स्पष्टीकरण देत म्हटले होते की, मला हे स्पष्ट करायचे आहे की, दिल बेचाराच्या सेटवर माझ्यासोबत वाईट वर्तन आणि सेक्शुअल हरॅशमेंट अशी कोणतीही घटना घडली नव्हती. या सर्वत निराधार वृत्तांना पूर्णविराम द्या.