आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धांजली:'दिल बेचारा'चे दिग्दर्शक मुकेश छाबरा यांनी शेअर केला सुशांतचा जुना ऑडिशन व्हिडिओ  

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुकेश छाबरा यांनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने सगळ्यांनाचा मोठा धक्का बसला आहे. तो आता या जगात नाही, यावर अजूनही लोकांचा विश्वास बसत नाहीये. त्याचा 'दिल बेचारा' हा चित्रपट अखेरचा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाबरा यांनी सुशांतचा एक अनसीन व्हिडिओ शेअर करुन त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.शेअर केलेल्या व्हिडिओत सुशांतचा पहिला चित्रपट 'काय पो चे'तील अनसीन व्हिडिओजसह 'पीके'च्या ऑडिशन क्लिपचाही समावेश आहे.  

मुकेश छाबरा यांनी ‘दिल बेचारा’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्यापूर्वी त्यांनी अनेक चित्रपटांसाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले आहे. सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाशिवाय मुकेश त्याचा पहिला चित्रपट 'काय पो चे'चे कास्टिंग डायरेक्टर होते. आता त्यांनी सुशांतच्या अभिनय प्रवासाची झलक व्हिडिओच्या रुपातून चाहत्यांना दाखवली आहे. व्हिडिओमध्ये सुशांत 'पीके' या ॉ चित्रपटासाठी ऑडिशन देतानाही दिसतोय. यात काही बिहाइंड द सीन शॉटचा समावेश आहे.

आपल्या टीमच्या वतीने श्रद्धांजली वाहताना मुकेश यांनी लिहिले, 'सुशांत सिंह राजपूत... एक असा मुलगा जो ऑडिशनमध्ये कधीही अपयशी ठरला नाही. आपल्या कौशल्याच्या बळावर त्याने प्रत्येकाच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. आमच्या टीमकडून सुशांतला ही श्रद्धांजली आहे. हा त्याचा प्रवास आहे ज्याचे आम्ही कायम कौतुक करू. रेस्ट इन लव्ह', अशा शब्दांत मुकेश यांनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.

मुकेश छाबरा दिग्दर्शित सुशांतचा अखेरचा चित्रपट 'दिल बेचारा' येत्या 24 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या हॉलिवूड चित्रपटाच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. सुशांतच्या चाहत्यांनी त्याचा हा अखेरचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहेत. तर काहींनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत असल्याने नाराजी व्यक्त केली आहेत.  

बातम्या आणखी आहेत...