आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

'दिल बेचारा'चा टायटल ट्रॅक रिलीज:दिग्दर्शकाने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ, सांगितले-  कशाप्रकारे फी न घेता गाणे कोरिओग्राफ करायला तयार झाली फराह खान

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'दिल बेचारा'चे शीर्षक गीत शुक्रवारी रिलीज झाले. दिग्दर्शक मुकेश छाबरांनी सांगितल्यानुसार, हे गाणे सुशांत सिंह राजपूतच्या करिअरचे शेवटचे गाणे ठरले.
Advertisement
Advertisement

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचार'चा टायटल ट्रॅक शुक्रवारी रिलीज झाला. हा एक डान्स नंबर आहे. ज्यात सुशांत एका कार्यक्रमात आपले डान्स मुव्स दाखवून प्रेक्षकांमध्ये बसलेली नायिका संजना सांघीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करीत आहे. ए. आर. रहमान यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला असून त्यांनीच ते संगीतबद्धही केले आहे. तर गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांचे आहेत. फराह खान कुंदर या गाण्याची कोरिओग्राफर आहे.

गाण्याचा व्हिडिओ शेअर करताना चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाबरा यांनी हे गाणे कोरिओग्राफ करण्यासाठी फराह खानसोबत झालेल्या संभाषणाविषयी सांगितले आहे. हे गाणे कोरिओग्राफ करण्यासाठी फराह खानने मानधन घेतले नव्हते.

मुकेश छाबरा आणि फराह खान कुंदर यांच्यातील चर्चा ..

फोन वाजतो ...

फराह: हां मुकेश, बोल

मुकेश: दीदी, मी सुशांत सोबत माझा पहिला चित्रपट बनवित आहे, हा फॉल्ट इन अवर स्टार्सचा हिंदी रीमेक आहे आणि त्यातील एखादे गाणे आपण कोरिओग्राफ करावेत अशी माझी इच्छा आहे.

फराह: ठीक आहे, मला गाणे पाठव.

मुकेश: पण दीदी, तुझी फी किती असेल?

फराह: मुकेश आधी गाणं पाठवलं.

मुकेश: गाणे पाठवले आहे.

फराह: बाप रे! हे गाणे खरोखर खूप चांगले आहे. चल आपण  हे संपूर्ण गाणे एकाच टेकमध्ये करुयात.

सुशांत हे गाणे चांगले करेल.

मुकेश: पण दीदी तू किती पैसे घेशील?

फराह: मुकेश तू वेडा आहेस का? हा तुझा पहिला चित्रपट आहे, हा माझ्याकडून तुला आशीर्वाद आहे. तू माझा भाऊ आहेस, शांत हो आणि तुझ्या निर्मात्यांना सांगा की, मी हे तुझ्या आणि सुशांतसाठी करीत आहे.

मुकेश: काय... धन्यवाद दीदी, लव्ह यू.

फराह: चल लव्ह यू... मी काम करतेय.

आणि अशाप्रकारे बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफरने #दिल बेचाराच्या शीर्षक गीतासाठी हो म्हणून ते शक्य बनवले. सुशांत आणि संगीतकार ए.आर. रहमान यांची जादू आणि अमिताभ भट्टाचार्य यांचे अप्रतिम शब्द सादर करीत आहोत. 

  • या गाण्याचा भाग असल्याबद्दल फराहने दिग्दर्शकाचे आभार मानले

फराह खाननेही सुशांतबद्दलचे आपले अनुभव सांगितले. ते म्हणाले, 'सुशांत काही वर्षांपूर्वी एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये सेलिब्रिटी जज म्हणून सहभागी झाला होता. तिथे आमची पहिली भेट झाली. तो एकमेव सेलिब्रिटी जज होता, जो स्पर्धकांपेक्षा चांगला नाचला. म्हणून जेव्हा मुकेशने मला दिल बेचारासाठी कोरियोग्राफ करण्यास सांगितले तेव्हा मी लगेच हो म्हणाले. मला माहित होते की, सुशांत खूप सहज डान्स करेल.'

फराह पुढे म्हणाली, 'हे गाणेही माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे. कारण मी पहिल्यांदा सुशांतला कोरिओग्राफ केले होते. आम्ही दोघे ब-याच काळापासून मित्र होतो, पण कधी एकत्र काम केले नव्हते. मी मुकेशला वचन दिले होते की, जेव्हा तो दिग्दर्शक होईल तेव्हा मला त्याच्यासाठी एक गाणे कोरिओग्राफ करायला नक्कीच आवडेल. मुकेशशी माझे वेगळे नाते आहे. तो मला बहीण मानतो. पाच वर्षांपूर्वी मी या लहान भावाला दत्तक घेतले होते. मला त्याच्या दिग्दर्शनाच्या प्रवासात सहभागी व्हायचे होते.'

'हे गाणे एका टेकमध्ये शूट करण्यासाठी सुशांतने मला एक अट घातली होती, ती म्हणजे मला तू तुझ्या घरी जेवायला बोलवायचं, असं तो म्हणाला होता. हे गाणे माझ्यासाठी खूप खास आहे. या प्रवासात मला सामील केल्याबद्दल मुकेश छाबरा यांचे आभार.'

'दिल बेचारा'चा टायटल ट्रॅक... 

Advertisement
0