आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शेवटचा चित्रपट:आज संध्याकाळी 7 वाजता रिलीज होत 'दिल बेचारा'; रिलीजपूर्वी अभिनेत्री संजना संघीने केली भावनिक पोस्ट

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिलीजपूर्वी संजनाने एक भावनिक पोस्ट केली आहे

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' आज(दि.24) रिलीज होत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर संध्याकाळी 7 वाजेपासून हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी उपलब्ध असेल. चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये खुप उत्सुकता आहे. चित्रपटाचा ट्रेल आणि गाणे यापूर्वीच हिट झाले आहेत. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी चित्रपटातील सुशांतची सह अभिनेत्री संजना संघीने सुशांतच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट केली आहे.

संजना संघीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शन लिहीले- "माय मॅनी, आशा आहे की, तु आम्हाला पाहत आहेस. आयुष्य सोपं नसतं. आम्हाला या मार्गावर चालत राहण्याची शक्ती देण्यासाठी धन्यवाद. अखेर तो दिवस आला आहे. हॅशटॅग दिल बेचारा."