आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रेलर रिलीज:दोन तासांत 5 लाख लोकांनी पाहिला सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'चा ट्रेलर, कॅन्सर पेशंटला हसवताना दिसला सुशांत 

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 24 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा' या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला. त्याचे चाहते याची उत्सुकतेने वाट पाहत होते. विशेष म्हणजे ट्रेलर यूट्यूबवर अपलोड होताच पहिल्या दोन तासांत सुमारे 5 लाख लोकांनी तो पाहिले. 24 जुलै रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होईल आणि सर्व प्रेक्षकांना (सब्सक्राइबर्स आणिर नॉन-सब्सक्राइबर्स) तो उपलब्ध असेल.

  • 'कसे जगायचे ते आपल्या हातात आहे'

किझी आणि मॅनी या दोघांची ही प्रेमकहाणी आहे. किझी कॅन्सरग्रस्त आहे आणि मॅनीचं तिच्यावर खूप प्रेम आहे. सुमारे अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये एक सेकंदही सुशांतवरुन नजर हटत नाही. तर किझीच्या भूमिकेत संजनाही लक्षात राहतेय. ट्रेलरमध्ये सुशांतचे अनेक उत्कृष्ट संवाद आहेत, ज्याद्वारे त्याने चित्रपटात कॅन्सरशी लढा देत असलेल्या संजना सांघीला हसवताना आणि तिचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमधील सुशांतचा एक संवाद अधिक लक्ष वेधून घेतो. 'जन्म आणि मरण आपल्या हातात नाही पण कसे जगायचे हे आपल्या हातात आहे', हा सुशांतचा संवाद मनाला भिडतो.

  • मुकेश छाबरांचा पहिला डिरोक्टोरियल चित्रपट 

'दिल बेचारा' हा कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी दिग्दर्शित केलेला त्यांचा पहिला चित्रपट आहे. यापूर्वी हा चित्रपट 'किझी और मॅनी' या नावाने तयार केला जात होता, परंतु फेब्रुवारी 2019 मध्ये त्याचे नाव 'दिल बेचारा' असे ठेवण्यात आले. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. ए. आर. रेहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे.  

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser