आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेक्षकांची आवडती मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील कलाकार नेहमी चर्चेत असतात. याच मालिकेतील मुख्य पात्र जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी यांच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे. 25 सशस्त्र लोक दिलीप जोशीच्या घराभोवती उभे आहेत, असे एका अज्ञात व्यक्तीने फोन करून नागपूर कंट्रोल रुमला सांगितले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी फोनची दखल घेत जोशी यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. नागपूर कंट्रोल रुम पोलिसांनी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला अॅलर्ट दिला असून एफआयआर दाखल करण्यास सांगितला आहे. फोन करणारा हा मुलगा दिल्लीच्या एका सिम कार्ड कंपनीत काम करतो. मात्र यात त्याचा काहीच सहभाग नसून एखाद्याने विशेष अॅपद्वारे त्या मुलाच्या नंबर वापरल्याचे पोलिसांनी सांगितले.
माहितीनुसार, नागपूर पोलिस कंट्रोल रुमला हा फोन गेल्या महिन्यात 1 फेब्रुवारीला आला होता. त्या व्यक्तीने फोनवर म्हटले होते की, दिलीप जोशी यांच्या घराशेजारील शिवाजी पार्कात 25 लोकं हातात शस्त्र आणि बॉम्ब घेऊन आहेत. एवढेच नाही तर काही लोकांना या कलाकारांबद्दल बोलताना ऐकल आहे. त्यामुळे त्याने महानायक अमिताभ बच्चन. धर्मेंद्र आणि मुकेश अंबानी हेही त्यांच्या रडावर असून त्यांचीही घरे बॉम्बने उडवणार आहेत. तपास केल्यानंतर हे सर्व फेक असल्याचे समोर आले होते. मात्र या कलाकारांच्या सुरक्षिततेच वाढ करण्यात आली होती. पोलिस आता त्या निनावी व्यक्तीचा शोध घेत आहे.
फोटोग्राफर्सवर वैतागणाऱ्या जया बच्चन यांनी चक्क हसत दिली पोज
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन या त्यांच्या तापट स्वभावासाठी ओळखल्या जातात. पापाराझींनी त्यांचे फोटो काढणे त्यांना मुळीच आवडत नाही. अनेकदा त्या फोटोग्राफर्सवर वैतागलेल्या दिसल्या आहेत. पण गुरुवारी मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. यावेळी जया बच्चन चक्क हसून फोटोग्राफर्सना भेटताना दिसल्या. इतके नाही तर त्यांनी यावेळी त्यांच्या रागामाचे कारणही सांगितले आहे. - येथे वाचा संपुर्ण बातमी.
ईशाने रोमँटिक अंजादात केले ऋषी सक्सेनाला बर्थडे विश
छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपली अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री ईशा केसकर आणि चॉकलेट बॉय ऋषी सक्सेना गेल्या चार ते पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आज ऋषीचा वाढदिवस असून यानिमित्ताने ईशाने खास अंदाजात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ईशाने तिच्या इन्स्टाग्रामवर ऋषीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.