आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार-मधुबाला यांची अधुरी प्रेमकहाणी:मधुबालाच्या वडिलांना पसंत नव्हते दोघांचे नाते, दिलीप कुमार यांच्या एका अटीमुळे दोघे झाले होते कायमचे विभक्त

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया मधुबाला आणि दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी...

दिलीप कुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. त्यांचे नाव कामिनी कौशल, मधुबाला यांच्यासोबत जुळले होते. कामिनी कौशल यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर मधुबाला दिलीप साहेबांच्या आयुष्यात आल्या होत्या. मात्र त्यांची प्रेमकहाणी अधुरी राहिली. दिलीप कुमार आणि मधुबाला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. परंतु यूसुफ अर्थातच दिलीप कुमार यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर तिने अवघ्या काही वर्षांतच जगाला 'अलविदा' म्हटले. दिलीप कुमार आणि मधुबाला कधीच एक होऊ शकले नाहीत. एका वळणावर दोघांचे नाते तुटले, त्यामागे दिलीप कुमार यांची एक अट होती. दिलीप यांनी मधुबालाला एका सिनेमाच्या सेटवर थोबाडीतही मारली होती. त्यानंतर दोघांचे नाते कसे तुटले. जाणून घेऊया मधुबाला आणि दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी...

मधुबाला यांनी पाठवले होते प्रेमपत्र
मधुबाला आणि दिलीप कुमार 'तराना' सिनेमाचे शूटिंग करत होते. पहिल्यांदाच दोघे एका सिनेमात एकत्र काम करत होते. मधुबाला दिलीप कुमार यांना पसंत करत होती, परंतु त्यांच्यावरचे प्रेम व्यक्त
करण्यास तिली भिती वाटत होती. दिलीप साहेब तिच्या प्रेमाला नाकारतील अशी तिच्या मनात भिती होती. परंतु एक दिवस मधुबालाने हिंमत करून दिलीप साहेबांना यांना एक पत्र लिहिले. त्या
पत्रासोबत लाल गुलाबसुध्दा पाठवले होते. पत्रात मधुबालाने लिहिले, 'मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि जर तुम्हीही करत असाल तर हे गुलाब स्वीकार करा अथवा पुन्हा परत पाठवा.'

दिलीप साहेबांनी केला प्रेमाचा स्वीकार
दिलीप यांनी मधुबाला यांच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि ते गुलाब आपल्याकडे ठेवले. असे म्हटले जाते, की मधुबाला दिलीप कुमार यांच्यावर खूप प्रेम करत होत्या. त्यांच्यासमोर कुणी दिलीप
कुमार यांचे नावदेखील घेतले तर त्या लाजायच्या.

बहरले दोघांचे प्रेम
दिलीप कूमार आणि मधुबाला यांची प्रेमकहाणी 'तराना'च्या सेटवर सुरु झाली आणि 'मुगल-ए-आजम'ची शूटिंग पूर्ण होता-होता संपुष्टात आली. मधुबाला यांना शूटिंगशिवाय इतर कार्यक्रम किंवा पार्ट्यामध्ये जाण्यास त्यांचा वडिलांची परवानगी घ्यावी लागत होती. शूटिंग सेटवरसुध्दा त्या कुणाला भेटू शकत नव्हत्या. हे मधुबाला यांचे प्रेम म्हणा अथवा वडिलांचा आदर. मधुलाबा यांचे वडील दोघांच्या प्रेमाविरोधात होते, तरीदेखील दोघे एकमेकांना भेटण्यासाठी काहीतरी बहाणा काढत होते.

मधुबालाच्या वडिलांना पसंत नव्हते दोघांचे नाते
मधुबाला आणि दिलीप कुमार एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडालेले होते. मात्र मधुबालाचे वडील अताउल्लाह खान यांना हे नाते पसंत नव्हते. मधुबाला कोणच्याही प्रेमात पडू नये असे त्यांना वाटत होते. त्यांनी दिलीप कुमार यांना रिजेक्ट केले होते. त्यावेळी 'नया दौर' सिनेमात दिलीप यांच्यासोबत मधुबालाला साइन करण्यात आले होते. शूटिंग मुंबई बाहेर होणार होते. परंतु मधुबालाच्या वडिलांनी तिला मुंबई बाहेर जाण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे दिग्दर्शकाने सिनेमात मधुबालाला काढून वैजयंतीमालाला घेतले. सिनेमा साईन करुन काम करण्यास नकार दिल्यामुळे निर्माता-दिग्दर्शक बी.आर.चोप्रा यांनी मधुबालावर खटला दाखल केला. हे प्रकरण न्यायालयात गेले. दिलीप साहेबांनी मधुबालाऐवजी बी.आर.चोप्रा यांना साथ दिली. त्यामुळे मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाले होते.

दिलीप साहेबांनी घातली होती मधुबालाला लग्नाची मागणी
'इन्सानियत' सिनेमाच्या प्रीमिअरवेळी एकत्र पोहोचून दोघांनी सर्वांना दाखवून दिले, की ते कुणाचीही पर्वा करत नाहीत. त्यानंतर दिलीप साहेबांनी मधुबाला यांच्या वडिलांना पत्र पाठवून, मधुबालासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु मधुबाला यांच्या वडिलांनी दिलीप यांच्या या प्रस्तावाला धुडाकावून लावले. 1956 मध्ये 'धाके की मलमल'च्या शूटिंगवेळी दिलीप कुमार यांनी अभिनेता ओमप्रकाश यांच्यासमोर मधुबालासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु दिलीप यांना एक अट ठेवली, की लग्नानंतर ते मधुलाबाला तिच्या वडिलांना भेटू देणार नाहीत. मधुबाला यांना वडील आणि दिलीप दोघेही चाहते होते, तिला दोघांपैकी एकाला निवडायचे होते, यात तिने आपल्या वडिलांची निवड केली. त्यानंतर दिलीप कुमार तिच्यापासून दूर गेले.

दिलीप साहेबांनी लगावली होती मधुबालाच्या थोबाडीत
काही दिवसानंतर दोघांनी 'मुगल-ए-आजम' सिनेमातील एक सीन शूट केला, त्यामध्ये सलीम अनारकलीला थोबाडीत मारतात. या सीनमध्ये दिलीप साहेबर यांनी थोबाडीत मारण्याचा अभिनय करण्याऐवजी खरंच मधुबालाच्या थोबाडीत मारली होती. सेटवर शांतता होती, लोक शांत होते आणि मधुलाबा शांतपणे उभ्या होत्या. तेव्हा सिनेमाचे दिग्दर्शक के. आसिफ यांनी मधुबालाला सांगितले की, त्यांचा दिलीप यांच्या थोबाडीत मारण्यामागील भावना सांगत आहेत, की ते आजही तुझ्यावर जीवापाड प्रेम करतात.

मधुबालाने किशोर कुमार तर दिलीप साहेबांनी बांधली होती सायरासोबत लगीनगाठ
काही काळानंतर किशोर कुमार मधुबालाच्या आयुष्यात आले आणि दोघांनी लग्न केले. तसेच दिलीप यांनी सायरा बानोसोबत लग्न केले. काळ बदलत गेला, परंतु मधुबालाच्या मनातील दिलीप यांनी जागा कधीच किशोर कुमार घेऊ शकले नाहीत. मधुबालाने आजारपणामुळे वयाच्या 32व्या वर्षीच जगाला अलविदा म्हटले. आयुष्याच्या शेवटी ती दिलीप कुमार यांच्यासोबत बोलायला लागली होती आणि त्यांच्यासोबत पुन्हा सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

बातम्या आणखी आहेत...