आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयातून घरी परतले ट्रॅजेडी किंग:रुग्णालयाबाहेर स्ट्रेचरवर दिसले 98 वर्षीय दिलीप कुमार, पत्नी सायरा यांनी घेतले त्यांच्या कपाळाचे चुंबन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
प्रकृती पूर्णपणे ठिक नसल्याने दिलीप साहेबांना 
स्ट्रेचरवरुन हिंदुजा हॉस्पिटलबाहेर आणण्यात आले. - Divya Marathi
प्रकृती पूर्णपणे ठिक नसल्याने दिलीप साहेबांना स्ट्रेचरवरुन हिंदुजा हॉस्पिटलबाहेर आणण्यात आले.
  • दिलीप कुमार यांच्यावतीने त्यांचे कौटुंबिक मित्र फैजल फारुकी यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांना शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना स्ट्रेचरवरुन बाहेर आणण्यात आले. ते खूप अशक्त दिसले. त्यांना तोंडावर मास्क लावला होता. यावेळी त्यांच्या पत्नी सायरा बानो त्यांच्यासह दिसल्या. त्यांनी बाहेर हजर असलेल्या मीडियाला हात हलवून अभिवादन केले. यावेळी सायराजींनी दिलीप साहेबांच्या कपाळाचे चुंबन घेतले.

5 दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते दिलीप साहेब
दिलीप साहेब हे गेल्या पाच दिवसांपासून हिंदुजा रुग्णालयात दाखल होते. रविवारी पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांना बायलेटरल प्ल्यूरल इफ्यूजन झाले होते. या आजारात छातीमधील फुफ्फुसांच्या चारही बाजुंनी पाणी जमा होते. त्याला वैद्यकीय भाषेत प्ल्यूरल इफ्यूजन म्हटले जाते. छातीत वारंवार पाणी भरल्याने फुफ्फुसांवर दाब येतो आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. डॉ. जलील पारकर यांनी सांगितल्यानुसार, वाढत्या वयोमानाने हा त्रास होत असतो.

सोशल मीडियावर देण्यात आली होती माहिती

दिलीप कुमार यांच्या वतीने त्यांचे कौटुंबिक मित्र फैजल फारुकी यांनी सोशल मीडियावर त्यांना डिस्चार्ज देण्याच आल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिल, "तुमच्या प्रेमामुळे, आपुलकीने आणि प्रार्थनेमुळे दिलीप साहेब रुग्णालयातून घरी परतत आहेत. डॉ. (नितीन) गोखले, (जलील) पारकर, डॉ. अरुण शाह आणि हिंदुजा हॉस्पिटल यांचे आभार."

मागील महिन्यातही रुग्णालयात झाले होते दाखल
यापूर्वी मे महिन्यात दिलीप कुमार यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण नेहमीच्या काही चाचण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सायरा बानो यांनी सांगितले होते. ‘आम्ही रुग्णालयात केवळ रुटिन चेकअप करण्यासाठी आलो आहोत,’ असे सायरा बानो म्हणाल्या होत्या.

दिलीप कुमार पद्मभूषण, दादासाहेब पुरस्काराने सन्मानित

दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान आहे. त्यांनी 'ज्वार भाटा' (1944), 'अंदाज' (1949), 'आन' (1952), 'देवदास' (1955), 'आझाद' (1955), 'मुगल-ए-आजम' (1960), 'गंगा' जमुना (1961), 'क्रांती' (1981), 'कर्मा' (1986) आणि 'सौदागर' (1991) यासह 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

फिल्मफेअरचे 1954 चे उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळवणारे दिलीप कुमार हे पहिले अभिनेते आहेत. त्यांना आठ वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1991 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल 1994 ला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन दिलीप कुमार यांना गौरवण्यात आले आहे. राष्ट्रपती कोट्यातून 2000-2006 दरम्यान त्यांना राज्यसभेचे सभासदत्व देण्यात आले होते. पाकिस्तान सरकारने 1998 मध्ये त्यांना ‘निशान-ए-इम्तियाझ’ हा पाकिस्तानमधील सर्वात उच्च असे नागरी पारितोषिक देऊन सन्मानित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...