आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलीप कुमार यांची प्रकृती नाजूक:98 वर्षीय दिलीप कुमार यांच्या पत्नी म्हणाल्या - साहेब खूप अशक्त झाले आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 11 डिसेंबर रोजी दिलीप साहेब वयाची 98 वर्षे पूर्ण करणार आहेत. मार्च महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुळे त्यांच्या दोन भावांचे निधन झाले.

बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती ठिक नाहीये. त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी एका इंग्रजी न्यूज वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार, दिलीप साहेबांची प्रकृती नाजूक आहे. ते खूप अशक्त झाले आहेत. त्यांची इन्मूनिटी अतिशय कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सायरा बानो यांनी सांगितले की, सध्या दिलीप कुमार यांची तब्येत अतिशय अशक्त आहे. रोगप्रतिकारशक्तीही कमी झाली आहे. अनेकदा ते हॉलपर्यंत येतात आणि लगेचच त्यांच्या खोलीत जातात. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे सायरा बानो यांनी चाहत्यांना म्हटले आहे.

'त्यांची काळजी घ्यायला आवडते'
सायरा बानो म्हणाल्या, 'मला त्यांची काळजी घ्यायला आवडते. माझे त्यांच्यावर अतिशय प्रेम आहे. त्यांना स्पर्श करायला मिळणं हीच माझ्यासाठी सर्वांत आनंदाची गोष्टी आहे. ते माझा श्वास आहेत. आमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी आम्ही देवाचे आभारी आहोत.'

मार्च महिन्यात झाली होती कोरोनाची लागण

दिलीप साहेब येत्या 11 डिसेंबर रोजी वयाची 98 वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यांना यावर्षी मार्चमध्ये कोरोनाची लागण झाली होती. याविषयी त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, "कोरोना व्हायरसमुळे मी पूर्णपणे आयसोलेशन आणि सेल्फ क्वारंटाइन आहे. मला कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून सायरा कसलीही कसर सोडत नाही."

कोरोनामुळे दोन भावांचे निधन
कोरोनामुळे या वर्षी दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचा मृत्यू झाला. 21 ऑगस्ट रोजी 88 वर्षीय अस्लम यांचे तर 2 सप्टेंबर रोजी 90 वर्षीय अहसान यांची कोरोनामुळे प्राणज्योत मालवली होती. यामुळे सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी 11 ऑक्टोबर रोजी आपल्या लग्नाचा 54 वा वाढदिवस साजरा केला नव्हता.

दिलीप कुमार पद्मभूषण, दादासाहेब पुरस्काराने सन्मानित

दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान आहे. त्यांनी 'ज्वार भाटा' (1944), 'अंदाज' (1949), 'आन' (1952), 'देवदास' (1955), 'आझाद' (1955), 'मुगल-ए-आजम' (1960), 'गंगा' जमुना (1961), 'क्रांती' (1981), 'कर्मा' (1986) आणि 'सौदागर' (1991) यासह 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

फिल्मफेअरचे 1954 चे उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळवणारे दिलीप कुमार हे पहिले अभिनेते आहेत. त्यांना आठ वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1991 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल 1994 ला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन दिलीप कुमार यांना गौरवण्यात आले आहे. राष्ट्रपती कोट्यातून 2000-2006 दरम्यान त्यांना राज्यसभेचे सभासदत्व देण्यात आले होते. पाकिस्तान सरकारने 1998 मध्ये त्यांना ‘निशान-ए-इम्तियाझ’ हा पाकिस्तानमधील सर्वात उच्च असे नागरी पारितोषिक देऊन सन्मानित केले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser