आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Dilip Kumar Passes Away; President Ram Nath Kovind, Prime Minister Narendra Modi, Amitabh Bachchan Akshay Kumar, Ajay Devgn And Other Celebs Pay Their Tributes To The Legend

ट्रॅजेडी किंगला आदरांजली:राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पीएम मोदी, अमिताभ बच्चन यांनी वाहिली दिलीप कुमार यांना श्रद्धांजली; आठवणींमध्ये सुभाष घाई झाले भावूक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होता. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता बुधवारी सकाळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर मित्र-परिवार आणि चाहत्यांसह कलाकारांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. यात सुभाष घाई दिलीप कुमार यांची आठवण काढताना भावूक झाले.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगान, चिरंजीवी, सोनू सूद, मधुर भांडारकर, रितेश देशमुख, सुभाष घाई यांच्यासह अनेकांनी ट्रॅजेडी किंगला श्रद्धांजली अर्पित केली. रामनाथ कोविंद यांनी लिहिले, "दिलीप कुमार यांनी उगवत्या भारताचा इतिहास संक्षिप्तमध्ये प्रस्तुत केले. थेस्पियनचे आकर्षण सर्वच सीमा ओलांडून गेला होता. त्यांच्यावर सर्वांनी प्रेम केले. त्यांच्या निधनानंतर एका युगाचा अंत झाला आहे. दिलीप साहेब भारताच्या मनात नेहमीच जिवंत राहतील. त्यांचे परिवार आणि असंख्य चाहत्यांविषयी संवेदना."

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले, "दिलीप कुमारजी सिनेमा लेजेंड म्हणून नेहमीच आठवणीत राहतील. त्यांना अद्वितीय प्रतिभेचे आशीर्वाद होते. त्यामुळे, त्यांनी कित्येक पिढ्यांच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे जाणे सांस्कृतिक जगताचे एक मोठे नुकसान आहे. त्यांचे कुटुंब आणि मित्रांसह असंख्य चाहत्यांविषयी संवेदना. RIP।"

अमित शहा यांनी लिहिले, "श्री दिलीप कुमारजी सिल्व्हर स्क्रीनचे एक सच्चे लेजंड होते. आपण आज भारतीय सिनेमातील महान अभिनेता गमावला. त्यांनी अविश्वसनीय अभिनय आणि प्रतिष्ठित भूमिकांननी सिनेमा प्रेमींच्या पिढ्यांचे मनोरंजन केले. दिलीपजींच्या कुटुंब आणि मित्रांसह असंख्य चाहत्यांविषयी संवेदना."

अमिताभ बच्चन यांनी लिहिले, "एक संस्थान गेले... भारतीय सिनेमाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तो इतिहास दिलीप कुमार यांच्याच अवकी-भोवती असेल... त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी दुआ करतो आणि ईश्वर त्यांच्या परिवाराला दुख सहन करण्याची शक्ती देवो. मला त्यांच्या निधनाचे ऐकून अंतःकरणातून दुख झाले."

अक्षय कुमारने लिहिले, "जगासाठी अनेक हिरो असतील. पण, आम्हा अभिनेत्यांसाठी तेच हिरो होते. दिलीप कुमार आपल्या सोबत भारचीय सिनेमाचे एक युग घेऊन गेले आहेत. माझ्या भावना आणि प्रार्थना त्यांच्या परिवारासोबत आहेत. ओम शांति."

चाहत्यांसह कलाकार देखील झाले भावूक 'एका युगाचा अंत!'

बातम्या आणखी आहेत...