आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युसूफ खानहून दिलीप कुमार बनण्याचा किस्सा:सिनेमात काम करण्यास दिलीप कुमार यांच्या वडिलांचा होता विरोध, वडील मारतील या भीतीने बदलले होते नाव

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देविका राणीने युसूफ खानला दिलीप कुमार म्हणून मोठ्या पडद्यावर सादर केले.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले आहे. ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिलीप साहंबांनी आज जगाला कायमचा निरोप घेतला. पण त्यांच्या आयुष्याशी निगडीत असे काही किस्से आहेत, जे त्यांचे चाहते कधीच विसरणार नाहीत. असाच एक किस्सा दिलीप साहेबांच्या नावाशी संबंधित आहे.

दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पेशावर (आता पाकिस्तानात) येथे झाला होता. दिलीप साहेबांचे वडील लाला गुलाम सरवर खान आणि आई आयशा बेगम यांनी आपल्या मुलाचे नाव युसूफ खान असे ठेवले. मग युसूफ खान दिलीप कुमार कसे झाले, हा प्रश्न नक्कीच चाहत्यांना पडतो. युसूफ खान दिलीप कुमार बनण्यामागची कहाणी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळाशी संबंधित आहे. 1944 मध्ये 'ज्वार भाटा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे भारतीय सिनेमाची पहिली स्टार अॅक्ट्रेस देविका राणीने युसूफ खानला दिलीप कुमार म्हणून मोठ्या पडद्यावर सादर केले.

नाव बदलण्याची कहाणी आत्मचरित्रात सांगितली
दिलीप कुमार यांनी त्यांच्या 'दिलीप कुमारः द सबस्टन्स अँड दी शॅडो' या आत्मचरित्रात नाव बदलण्याची कहाणी सांगितली आहे. दिलीप साहेब यांनी लिहिले - देविकाने मला सांगितले - युसूफ मी तुम्हाला अभिनेता म्हणून लाँच करण्याचा विचार करीत आहे आणि मला वाटते की आपण आपले स्क्रीन नाव बदलले पाहिजे. एक असे नाव ज्याद्वारे तुम्हाला ओळखले जाईल. एक असे नाव जे स्क्रीनवर दिसणार्‍या तुमच्या रोमँटिक प्रतिमेस अनुरुप असे असेल. मला वाटते की दिलीप कुमार हे एक चांगले नाव आहे. तुम्हाला हे नाव कसे वाटले?, असा प्रश्नही देविका रानीने दिलीप साहेबांना विचारला.

दिलीप कुमार यांना हे नाव आवडले. दिलीप कुमार या नावाने त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आणि याच नावाने ते जगभरात प्रसिद्ध झाले.

नाव बदलण्याचा आणखी एक किस्सा

दिलीप कुमार यांचा नाव बदलण्याचा आणखी एक किस्सा आहे. त्यांच्या वडिलांना फिल्मी दुनिया आवडत नव्हती. आपल्या मुलाने या क्षेत्रात यावे असे त्यांना वाटत नव्हते. स्वत: दिलीप कुमार यांनी हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता.

दिलीप साहेबांनी सांगितले होते की, माझ्या वडिलांच्या माराच्या भीतीने मी नाव बदलले. सिनेमात काम करण्यास माझ्या वडिलांचा विरोध होता. त्यांच्या मित्राचा मुलगा पृथ्वीराज कपूर सिनेमात काम करत होते. त्यावेळी माझे वडील मित्राच्या घरी जायचे. तुमचा मुलगा काय काम करतोय? अशी तक्रार करायचे. जेव्हा मी सिनेमा क्षेत्रात आलो तेव्हा वडिलांना माहीत पडले तर ते नाराज होतील, याची मला भीती वाटली. त्यामुळे माझ्या समोर दोन तीन नावांचा प्रस्ताव ठेवला गेला. दिलीप कुमार नाव ठेवावे किंवा बासुदेव नाव ठेवावे असे मला सांगितले गेले. युसूफ खान हे नाव कायम ठेवण्याचा सल्लाही दिला गेला. पण मला ते नाव ठेवायचे नव्हते. काही दिवसानंतर मी पेपरमध्ये एक जाहिरात पाहिली. त्यावेळी माझे नाव दिलीप कुमार ठेवल्याचे मला कळले, असे दिलीप कुमार यांनी सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...