आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार यांच्या पुण्याशी संबंधित आठवणी:दिलीपकुमार म्हणाले होते - स्वकमाईचा पहिला आनंद मला पुण्याने दिला...

जयश्री बोकीलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलीप कुमार यांनी 1940 मध्ये पुणे कॅम्पमध्ये आर्मीच्या कँटीनबाहेर सँडविचचा स्टॉल लावला होता.

पुणे शहर अनेक सेलिब्रिटींच्या सुरुवातीच्या दिवसांचे साक्षीदार आहे. अनेक मान्यवर व्यक्तींच्या जीवनातील एक हिस्सा पुण्याशी या ना त्या रूपाने जोडला गेला आहे. देवानंद, दिलीपकुमार, व्ही. शांताराम, गुरुदत्त, जयाभादुरी, डॅनी, शत्रुघ्न सिन्हा, सुभाष घई....यादी खूप मोठी आहे. दिलीपकुमार यांनी पुणे शहरात स्वकमाई कशी केली याची एक आठवण डॉ. शैलेश गुजर यांनी जागवली.

डॉ. गुजर म्हणाले की, पुणे रेसिडेन्सी क्लबतर्फे दर वर्षी ‘प्राईड ऑफ पुणे’ पुरस्कार दिला जातो. अशाच एका समारंभास नाना चुडासामा, दिलीपकुमार, सायराबानो आले होते. तेव्हा मला त्यांची भेट मिळाली होती. मी नेहमी दिग्गज व्यक्तिमत्त्वांना पुणे शहराविषयी बोलते करतो. त्यातून खूपच चांगली आणि वेगळी माहिती मिळते. दिलीपकुमारही त्याला अपवाद नव्हते! त्यांनी मोजक्या मराठी शब्दांत पुण्याविषयीच्या भावना मांडल्या होत्या.

त्यांना मी विचारले होते, की पुणे शहरांविषयीचे तुमचे काय मत आहे? तेव्हा ते थोडे भावनावश झाले. काहीच बोलले नाहीत. मला वाटले आपण काही चुकीचे तर विचारले नाहीना? पण तसं काहीच नव्हतं. दोन मिनिटांच्या पाॅजनंतर कपाळावर आठ्या पाडून दिलीपकुमार म्हणाले, ‘इस पुणे सिटीने मुझे जिंदगी मे पहले सौ रुपये कमानेका मौका दिया है!’

मला काहीच कळेना, माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहून ते म्हणाले, ‘बेटा सुनो, आपका जन्म नही हुआ था, 1940 में मैने पुणे कैम्प मे आर्मी के कैन्टिन के बाहर सँडविच का स्टॅाल लगाया था। पिताजी से झगडा करके पुना आया था।

आर्मी कॅन्टीन सँडविच स्टॅालवरून मी पाच हजाराची बचत केली, सेव्हिंग जमवले आणि मुंबईला परत गेलो. त्या कॅन्टीनमधून मी जेव्हा पहिल्या 100 रुपयाचे सेव्हिंग केले, तो दिवस माझ्या कायम स्मरणात आहे, कारण तो दिवस पुण्यातला होता..!

बातम्या आणखी आहेत...