आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थ अपडेट:दिलीप कुमार यांना आज ICU तून जनरल वॉर्डात केले जाणार शिफ्ट, नसीरुद्दीन शाह यांना मिळू शकते रुग्णालयातून सुट्टी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलीप कुमार यांची प्रकृती आता स्थिर आहे.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना जून महिन्यात दुस-यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची देखभाल करणा-या दोन डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, त्यांना सोमवारी ICU मधून जनरल वॉर्डात शिफ्ट केले जाऊ शकते. तर दुसरीकडे नसीरुद्दीन शाह यांना आज रुग्णालयातून सुट्टी मिळू शकते. काही दिवसांपूर्वी त्यांना न्युमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दिलीप कुमार यांना 29 जून रोजी रात्री पुन्हा एकदा श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला तेव्हा कुटुंबियांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मुंबईतील खारमधल्या पी डी हिंदूजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हृदय रोग तज्ज्ञ डॉ. नितिन गोखले यांनी सांगितल्यानुसार, आता दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना सोमवारी आयसीयूतून बाहेर आणण्यात येईल.

जूनमध्ये दोनदा झाले रुग्णालयात दाखल
दिलीप कुमार यांना यापूर्वी 6 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हादेखील त्यांना श्वास घेण्यात त्रास जाणवला होता. त्यावेळी त्यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाले होते. 9 जून रोजी त्यांच्यावर एक लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. वैद्यकीय भाषेत या शस्त्रक्रियेला 'प्ल्यूरल एस्पिरेशन' म्हटले जाते. ही शस्त्रक्रिया मुख्यतः फुफ्फुसात जमा झालेला कफ, श्वास घेण्यास येणाऱ्या अडचणी आणि छातीतील वेदना दूर करण्यासाठी केली जाते. यावेळी सुमारे 350 मिलीलीटर द्रव त्यांच्या फुफ्फुसातून काढून टाकण्यात आला होता. ज्यानंतर दिलीप कुमाराला खूप अशक्तपणा जाणवत होता. या उपचारानंतर त्यांची ऑक्सिजनची पातळी वाढू लागली. पाच दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना 11 जून रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.

नसीर यांचा न्युमोनिया बरा झाला
नसीरुद्दीन शाह हेदेखील रुग्णालयात दाखल आहेत. आता त्यांची प्रकृती बरी आहे. त्यांना न्यूमोनिया झाला असून त्यांच्या फुप्फुसात एक पॅच आढळला होता. यापूर्वी त्यांना रविवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार होती. मात्र त्यांना आणखी एक दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले. त्यांना आज (सोमवारी) सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. मीडियाशी बोलताना नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नी रत्ना पाठक यांनी सांगितले होती की, त्यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचे कारण नाही. तसेच त्यांना कोरोना किंवा इतर कोणताही आजार नसल्याचे रत्ना पाठक यांनी सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...