आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीतील दिलीप कुमार:दिलीप साहेबांचा शेवटचा चित्रपट 'किला’चे दिग्दर्शक उमेश मेहरा म्हणाले - समर्पण असे की, 101 डिग्री तापातही ब्रेक न घेता केले शूटिंग

अमित कर्णएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलीपकुमार यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान

1998 मध्ये आलेल्या 'किला' या चित्रपटात दिलीप कुमार यांनी शेवटचे मोठ्या पडद्यावर काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश मेहरा यांनी दिलीप साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

उमेश मेहरा यांनी सांगितले, ‘माझा चित्रपट ‘किला’चे लेखक हुमायूं मिर्झाने दिलीप साहेबांना जाऊन स्क्रिप्ट ऐकवली. त्यांना ती आवडली. नंतर मीदेखील त्यांना भेटायला गेलो. कारण माझे वडील एफसी मेहरा आपल्या काळात मोठे निर्माते होते. दिलीप साहेबदेखील त्यांना ओळख होते. मी त्यांना म्हणालो, दिलीप साहेब चित्रपट सुरू होण्याआधी त्यावर जितकी चर्चा करायची आहे करा आणि तुमच्या सहा महिन्याच्या तारखा मला द्या. त्यांनी शूटिंग सुरू होण्याआधीच तसेच केले. त्यांनी 7 महिन्याच्या आपल्या तारखा दिल्या. मात्र त्यांनी 6 महिन्यातच शूटिंग पूर्ण केले. '

पुढे त्यांनी सांगितले, 'दिलीप साहेबांना तंत्रज्ञानाचेही ज्ञान होते. रिकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जेव्हा ते आत आपला व्हाइस डब करत होते तेव्हा आम्ही पाहिले की, व्हाइस लेव्हेलमध्ये मॉड्यूलेशन होत होते. नंतर आम्हाला कळाले की, दिलीप साहेब अापल्या आवाजात लाँग शॉट, मिड शॉट आणि क्लोज अप शॉटमध्ये चढ-उतार करत होते.'

दिलीप साहेबांच्या कामाच्या समर्पणाविषयी बोलताना मेहरा म्हणाले, 'शूटिंगचा पहिला दिवस होता आणि दिलीप साहेबांचा अभिनय पाहून आम्ही स्तब्ध झालो होतो. नंतर कळाले त्यांना 101 डिग्री ताप होता. तरीदेखील त्यांनी शूटिंगमधून एकदाही ब्रेक घेतला नव्हता. सुरुवातील त्यांनी फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंतच शूटिंग करणार असल्याचे सांगितले होते. नंतर त्यांना शूटिंगमध्ये मजा येऊ लागली आणि उशीरापर्यंत थांबू लागले.'

बातम्या आणखी आहेत...