आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाने दोन भाऊ हिरावले:ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या दुस-या भावाचेही निधन, 13 दिवसांत दोन भावांची मालवली प्राणज्योत; दोघांनाही झाली होती कोरोनाची लागण

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिलीप कुमार यांचे दोन्ही भाऊ असलम आणि अहसान वेगळ्या घरात राहात होते, त्यामुळे दिलीप कुमार आणि सायरा बानो यांना कोरोना संसर्ग झाला नाही. - Divya Marathi
दिलीप कुमार यांचे दोन्ही भाऊ असलम आणि अहसान वेगळ्या घरात राहात होते, त्यामुळे दिलीप कुमार आणि सायरा बानो यांना कोरोना संसर्ग झाला नाही.
  • दिलीप कुमार यांचे सर्वात लहान भाऊ असलम खान यांचे 21 ऑगस्ट रोजी निधन झाले होते.
  • दोन्ही भावांना 15 ऑगस्ट रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
  • दोन्ही भावांची रॅपिड एंटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 21 ऑगस्ट रोजी सर्वात लहान भाऊ असलम खान यांचे कोविड 19 ने निधन झाल्यानंतर आता त्यांच्या दुस-या भावाचाही प्राणज्योत मालवली आहे. बुधवारी रात्री 90 वर्षीय अहसान खान यांनी रात्री 11 वाजताच्या सुमारात लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील पारकर यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हॉस्पिटलच्या सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना क्रिटिकल केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले आहे.

दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आर्टिफिशिअल ब्रिदिंग सपोर्टवर ठेवण्यात आले. 15 ऑगस्ट रोजी दोघांचेही कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

  • असलम खान यांचे 13 दिवसांपूर्वी झाले होते निधन

21 ऑगस्ट रोजी असलम खान यांचे निधन झाले होते. ते 88 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आर्टिफिशियल ब्रिदिंग सपोर्टवर ठेवण्यात आले होते. 15 ऑगस्ट रोजी दोघांचेही कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. श्वास घ्यायला त्रास जाणवू लागल्याने आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे अहसान आणि असलम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. असलम आणि अहसान यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सायरा बानो यांनी वृत्त्ताला अधिकृत दुजोरा दिला होता. डॉक्टर जलील पारकर आणि हृदय रोग तज्ज्ञ नितीन गोखले त्यांच्यावर उपचार करत असल्याचे सायरा बानो यांनी सांगितले होते.

  • दोन्ही भाऊ बहिणीसोबत राहत होते

गेल्या महिन्यात एका न्यूज वेबसाईटशी झालेल्या संभाषणात दिलीप कुमारच्या यांच्या पत्नी सायरा बानो यांनी सांगितले होते ती, अहसान खान आणि असलम खान त्यांची बहीण फरीदा (ज्या पूर्वी अमेरिकेत राहत होत्या) सोबत राहत होते. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत विचारणा करणारे फोन कॉल्स आल्यानंतर सायरा बानो यांनी हा खुलासा केला होता.

सायरा म्हणाल्या होत्या, "मी हे यासाठी सांगत आहे, कारण जेव्हापासून अहसान भाई आणि असलम भाई यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले तेव्हापासून लोक दिलीप साहेबांच्या प्रकृतीबद्दल विचारणा करत आहेत. अनेकांना वाटते की, अहसान भाई आणि असलम भाई आमच्याबरोबर राहत होते. पण ते आमच्यासोबत राहात नव्हते. कोरोनाची साथ पसरल्यापासून आम्ही गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही घराबाहेर पडलेलो नाहीत.''

  • दोन्ही भावांसोबत होता प्रॉपटीवरुन वाद

वृत्तानुसार, दिलीप कुमार यांचा आपल्या या दोन्ही भावडांसोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. दिलीप कुमार यांच्या 1600 चौरस फूट मध्ये असलेल्या बंगला नंबर 16 वरुन हा वाद होता. या बंगल्याची किंमत तब्बल 250 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

2014 मध्ये दिलीप आणि त्यांची पत्नी सायरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. या मालमत्तेवर अहसान आणि असलम यांचा कोणताही हक्क नाही, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. 2007 च्या कराराअंतर्गत दिलीप कुमार अहसान यांना 1200 चौरस फूट तर असलम यांना 800 चौरस फूट फ्लॅट देणार होते. पण दिलीप साहेबांना जेव्हा या बंगल्याचे नूतनीकरण करायचे होते तेव्हा दोन्ही भावांनी तो रिकामा करण्यास नकार दिला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser