आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार यांची बहीण फरिदा रुग्णालयात दाखल:सायरा बानो पुतण्यासोबत मिळून घेत आहेत काळजी

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांची धाकटी बहीण फरिदा यांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलीप कुमार आणि फरिदा यांचा पुतण्या साकिब (मेहबूब खान यांचा नातू) आणि सायरा बानो हॉस्पिटलमध्ये त्यांची काळजी घेत आहेत.

फरिदा यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे
ETimes च्या वृत्तानुसार, फरिदा यांची प्रकृती ढासळली होती. पण कालपासून त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा आहे. त्या मागील आठवडाभरापासून रुग्णालयात दाखल आहेत.

सायरा यांनी 1966 मध्ये दिलीप कुमार यांच्याशी लग्न केले होते.
सायरा यांनी 1966 मध्ये दिलीप कुमार यांच्याशी लग्न केले होते.

दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर सायरा यांची तब्येत वरचेवर खराब होत असते. त्या अनेकदा इस्पितळात तपासणीसाठी जाताना दिसतात. मात्र तब्येत ठीक नसतानाही त्या सतत फरिदा यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात आहेत आणि डॉक्टरांकडून त्यांची चौकशी करत आहेत.

सायरा यांनाही गेल्या वर्षी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते
गेल्या वर्षी सायरा बानो यांनाही हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रक्तदाबाचा त्रास होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार झाले होते.

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा यांना नैराश्याने ग्रासले होते.
दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा यांना नैराश्याने ग्रासले होते.

सायरा आणि दिलीप यांची जोडी
सायरा बानो यांनी 1961 मध्ये आलेल्या 'जंगली' चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली. या चित्रपटात त्या शम्मी कपूरसोबत झळकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 'ब्लफ मास्टर', 'झुक गया आसमान', 'आई मिलन की बेला', 'प्यार मोहब्बत', 'व्हिक्टोरिया नंबर 203', 'आदमी और इंसान' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. सायरा-दिलीप या जोडीने 'सगीना' आणि 'गोपी'सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि 1966 मध्ये लग्न केले. दिलीप कुमार यांचे 7 जुलै 2021 रोजी वयाच्या 98 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...