आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सुपुर्द ए खाक' झाले दिलीप साहेब:शासकीय इतमामात झाले दिलीप साहेबांवर अंत्यसंस्कार, साश्रूनयनांनी दिला सगळ्यांनी अखेरचा निरोप

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शासकीय इतमामात दिलीप साहेबांना अखेरचा निरोप देण्यात आला.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा दफनविधी संपन्न झाला आहे. जुहू येथील कब्रस्थानात त्यांना सुपूर्द ए खाक करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. राज्य पोलिसांची बटालियन दुपारी 1.30 च्या सुमारास दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचली होती. दिलीप कुमार यांच्या घरुन त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती.

दिलीप साहेबांचा दफनविधी
दिलीप साहेबांचा दफनविधी

घरून त्यांचे पार्थिव थेट स्मशानभूमीत नेण्यात आले. दफनविधीवेळी सायरा बानोदेखील उपस्थित होत्या.

दिलीप साहेबांचे पार्थिव कब्रस्थानात नेण्यात आले.
दिलीप साहेबांचे पार्थिव कब्रस्थानात नेण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिलीप कुमार यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी त्यांनी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही होते. यासोबतच शासकीय सन्मानात दिलीप कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीप साहेबांचे अंत्य दर्शन घेतले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीप साहेबांचे अंत्य दर्शन घेतले.

अभिनेते धर्मेंद्र यांना दिलीप साहेबांचे अंत्यदर्शन घेताना अश्रू अनावर झाले होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीप साहेबांचे अंत्यदर्शन घेतले.

अभिनेत्री क्रिती सेनॉनची माध्यमांकडे विशेष मागणी

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने प्रसारमाध्यमं आणि छायाचित्रकारांना दिलीप कुमार यांची अंत्ययात्रा न दाखवण्याची विनंती केली होती. तिने याविषयी सोशल मीडियावर एक खास नोट शेअर केली होती.

अनेक दिवसांपासून आजारी होते दिलीप कुमार

दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ उतार होत होते. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील महिन्यात उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते. परंतू 29 जून रोजी पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु यावेळी त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. अखेर बुधवारी सकाळी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...