आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर एक्सक्लूझिव्ह:लता मंगेशकर यांनी सांगितले - दिलीपजींनी वकील बनून माझा खटला लढवला अन् तो जिंकलाही, जिंकल्यावर म्हणाले होते - ‘मेरी बहन, तू मस्तपणे राहा'

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: उमेश कुमार उपाध्याय
  • कॉपी लिंक
  • दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल ‘दैनिक भास्कर’ने स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी संवाद साधला.

बॉलीवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार (९८) यांचे बुधवारी निधन झाले. मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. तिरंग्यात ठेवलेल्या दिलीपकुमार यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी मुंबईच्या सांंताक्रूझमधील जुहू कब्रस्तानमध्ये शासकीय इतमातात दफनविधी करण्यात आला. यावेळी पत्नी सायरा बानू व इतर निवडक लोक उपस्थित होते. दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल ‘दैनिक भास्कर’ने स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी संवाद साधला. त्यातील हा निवडक अंश...

दिलीपकुमार यांच्याबाबत सर्वात रोचक बाब म्हणजे, मी त्यांच्यासोबत गाणे गायले होते. त्यांचा गळा बऱ्यापैकी होता. मात्र पहिल्यांदाच गात असल्याने जरा घाबरलेलेच होते. संगीतकार सलील चौधरी म्हणाले, यूसुफ तुम्ही घाबरू नका, फक्त गात राहा. तुम्हाला जे गायचे आहे ते गा. मग त्यांनी डोळे बंद करून शास्त्रीय गायन सुरू केले. ते इतके लांबले की सलील चौधरी त्यांच्यासमोर जाऊन बंद करा, असा इशारा करू लागले. मात्र डोळे बंद असल्याने ते गातच राहिले. डोळे उघडले तेव्हा समोर सलीलदा दिसले. ते म्हणाले, युसूफ तुम्ही खूप छान गायलात. हे गाणे आपण इतर कुठेतरी वापरू. आता जे गायचे आहे ते गाऊत. अशा पद्धतीने ते गाणे रेकॉर्ड झाले. त्यांना इतक्या तन्मयतेने गात असल्याचे पाहून मला काैतुक वाटले.

मला इतकेच आठवते की त्याचे रेकॉर्डिंग मेहबूब स्टुडियोत होते आणि ऋषिकेश मुखर्जी हे चित्रपट दिग्दर्शक होते. चित्रपट ‘मुसाफिर’ आणि गाणे ‘लागी नाहीं छूटे रामा, चाहे जिया जाए’ हे होते.ते गाण्याच्या रेकॉर्डिंगला येत नसत. बहुतांश वेळा शूटिंगमध्येच व्यग्र राहायचे. कामात एकदम हरवून जायचे. ते ‘गंगा जमुना’च्या वेळी रेकॉर्डिंगला आल्याचे अंधुकसे आठवते. ते कोणत्याही गोष्टीला घाबरत नसत आणि येत नसलेले कामही बिनधास्तपणे करून टाकायचे. असाच एक किस्सा सांगते... बहुतेक १९६३-६४ चा काळ असावा.

एका निर्मात्याने आमच्यावर खटला गुदरला होता. त्यात मी, युसूफ भाई आणि अाणखी एकाचे नाव होते. आम्ही त्यांच्याकडून काळापैसा घेतो, असा आरोप खटल्यात केला होता. हे कळाल्यानंतर युसूफभाईंना खूप वाईट वाटते. त्यांचा असिस्टंट म्हणाला, आपण कोर्टात जाऊ आणि खटला लढू. होकार देत युसूफभाई म्हणाले, हा खटला मीच लढवणार. गोंधळून असिस्टंट म्हणाला, खटले तर वकील लढवत असतात, साहेब. तुम्ही तेथे काय करणार? त्यावर ते म्हणाले, मी वकील बनून जाईल अन् खटला लढवेन. त्यांनी असिस्टंटला कोर्टाकडून एक महिन्याची मुदत मागून घेण्यास सांगितले. मी म्हणाले, युसूफभाई निर्मात्याने माझ्यावरही खटला दाखल केला आहे. त्यांनी विचारले, तुझ्यावर किती रुपयांची केस केली आहे? मी उत्तरले - ६०० रुपयांची. हे ६०० रुपये मी दोन-तीन गाण्यांसाठी घेतले होते, तेही ‘साइन’ करून आणले होते. त्यांनी सर्वांची नावे विचारली.

मी म्हणाले, आपणच तिघे आहोत. ते म्हणाले, मीच सर्वांचा खटला लढवणार. त्यांनी वकिलीची सर्व पुस्तके वाचली आणि तारखेला कोर्टात जाऊन उभे ठाकले. त्यांनी असा काही युक्तिवाद केला की आम्ही खटला जिंकलो. त्यांची हिंमत ही अशी होती. विजयानंतर मला त्यांचा फोन आला. म्हणाले - ‘मेरी बहन,’ तू मस्तपणे राहा. आपण जिंकलो आहोत. त्यांची स्मरणशक्ती तल्लख होती. उर्दू तर कमालीची होती. शेकडाे शेर त्यांना तोंडपाठ होते. त्यांच्या धर्मातील गोष्टीही त्यांना स्मरणात होत्या. मला ते ‘बहन’ संबोधायचे. मी त्यांना राखीही बांधायचे. ते नेहमी माझी काळजी घ्यायचे. काही अडचण असेल तर मला सांग, असे आवर्जून म्हणायचे.

बातम्या आणखी आहेत...