आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गायक आणि अभिनेता दिलजित दोसांज 37 वर्षांचा झाला आहे. 6 जानेवारी 1984 रोजी जालंधरमधील कलां गाव येथे जन्मलेल्या दिलजीतचे खरे नाव दलजीत आहे. त्याचे वडील बलबीर सिंग पंजाब रोडवेजमध्ये कर्मचारी होते तर आई सुखविंदर गृहिणी होत्या.
दिलजीतची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काही विशेष नव्हती. त्याची शिक्षणात फारशी रुची नव्हती, मात्र गाण्याकडे त्याचा कल होता. त्याने लुधियाना येथे राहून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. स्थानिक गुरूद्वारांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आणि तिथेच कीर्तन सुरू केले. कीर्तन करतांना प्रत्येकाला दिलजीतचा आवाज आवडला. लोकांनी त्याला बाहेर गाण्यासाठी प्रोत्साहित केले. गुरुद्वारानंतर दिलजीतने लग्नाच्या कार्यक्रमांत गाणे सुरू केले.
'उडता पंजाब' मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री
2004 मध्ये दलजीतने आपला पहिला अल्बम 'इश्क दा उडा अड्डा' रिलीज केला. यादरम्यान त्याने दलजीत हे नाव बदलून ते दिलजीत केले. 2011 मध्ये ‘द लायन ऑफ पंजाब’ या चित्रपटातून त्याने डेब्यू केला, तो चित्रपट फ्लॉप झाला पण त्याचे एक गाणे सुपरहिट ठरले आणि पहिल्यांदाच बीबीसीच्या एशियन डाउनलोड चॅटमध्ये नॉन बॉलिवूड सिंगरचे गाणे टॉपवर पोहोचले. 2016 मध्ये त्याने 'उडता पंजाब' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर फिल्लौरी, सूरमा, अर्जुन पटियाला, गुड न्यूज आणि सूरज पे मंगल भरारी या चित्रपटात त्याने काम केले. लॉकडाऊन दरम्यान, त्याने त्याचा संगीत अल्बम 'जी.ओ.ए.टी.' रिलीज केला
पगडीविषयी पजेसिव्ह
दिलजीतविषयी असे म्हणतात की, तो पहिला सरदार आहे ज्याने आपली ओळख न सोडता बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोक त्याला सल्ला देत असत की पगडीमुळे त्याला कोणतीही भूमिका मिळणार नाही. यावर तो म्हणाला की, भूमिका मिळो अथवा न मिळो, परंतु तो पगडी काढणार नाही. भूमिकेसाठी ऑडिशन देणे पसंत नसल्याचे दिलजीतविषयी बोलले जाते. मीडिया रिपोर्टनुसार दिलजीतची एकूण मालमत्ता 185 कोटी आहे.
दिलजीतला इंग्रजी येत नाही
दिलजीतला त्याचे चाहते अर्बन पेंडू म्हणतात. अर्बन म्हणजे शहरी आणि पेंडूचा अर्थ गाव असा होतो. चाहते त्याला शहरी आणि गावाचे मिश्रण मानतात. दिलजीतला इंग्रजी येत नाही. एकदा लंडनमध्ये व्होग मॅगझिनला याच कारणामुळे तो मुलाखत देऊ शकला नव्हता. 2017 मध्ये त्याने खासगी जेट खरेदी केल्याच्या बातम्या आल्या पण दिलजीतने त्या वृत्ताचे खंडन केले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.