आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलजित दोसांजने कंगनाला सुनावले:'बंदा इतना भी अंधा नही होना चाहिए'... म्हणत दिलजित दोसांजने कंगनाला झापले, शेतकरी आंदोलनातील वृद्ध महिलेवर केली होती कंगनाने टीका

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता दिलजित दोसांजने एक पोस्ट करुन कंगनाला चांगलेच सुनावले आहे.

सतत नवनवीन विधानं करुन चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रनोट हिने अलीकडेच शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेची खिल्ली उडवली होती. शेतकरी आंदोलनात सामील वृद्ध महिलेला दिल्लीच्या शाहीन बागेतील आंदोलनात सामील झालेल्या 90 वर्षांच्या बिलकीस बानो समजून कंगनाने त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर ती ट्रोल झाली आणि त्यानंतर तिने तिची पोस्ट सोशल मीडियावरुन डिलीट केली होती. आता अभिनेता दिलजित दोसांजने एक पोस्ट करुन यावरुन कंगनाला चांगलेच सुनावले आहे.

दिलजित दोसांजने त्या वृद्ध महिलेचा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ‘महिंदर कौर, मी तुमचा आदर करतो. कंगना हे ऐक. बंदा इतना भी अंधा नही होना चाहिए’ या आशयाचे कॅप्शन देत त्याने कंगनाला सुनावले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात अनेक वृद्ध शेतकरी आणि त्यांची कुटुंबे सामील झाली आहेत. यात सामील एक वर्षीय वृद्ध महिला, ज्यांना सगळे ‘दादी’ म्हणत आहेत, त्यांच्यावरच कंगनाने टीका केली होती. कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘हा..हा..हा.. या त्याच दादी आहेत, ज्यांना टाईम मॅगझिनने सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये सामील केले आहे. या आता 100 रुपयांत उपलब्ध आहेत. पाकिस्तानी पत्रकार भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कुप्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला असे लोक हवे आहेत, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्यासाठी आवाज उठवू शकतील.’ या पोस्टनंतर तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. सदर प्रकार लक्षात आल्यावर कंगनाने आपले ट्विट डिलीट केले. मात्र, यावर कुठलेही स्पष्टीकरण तिने अद्याप दिलेले नाही. तसेच तिने माफीदेखील मागितली नाही. कंगनाच्या या डिलीट पोस्टचे स्क्रिन शॉट काढून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

कंगनाने माफी मागावी, याचिका दाखल
कंगनाने आता या आजीची 7 दिवसांत माफी मागावी, अशी कायदेशीर नोटीस तिला पाठवण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणाच्या हायकोर्टातील चंडीगड स्थित जेष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते हाकम सिंह यांनी कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. वकील हाकम सिंह यांनी पाठवलेल्या या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ‘आंदोलन करणे हा प्रत्येक व्यक्तीचा संविधानिक विशेष अधिकार आहे. मात्र. कंगनाच्या या वक्तव्यामुळे आंदोलनात सामील झालेल्या वृद्ध महिलेसह देशभरातील इतर महिलांचा देखील अपमान झाला आहे. त्यामुळे कंगनाने या प्रकरणी माफी मागितली पाहिजे.’ माफी न मागितल्यास कंगनाविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली जाईल, असे देखील या नोटीसमध्ये म्हणण्यात आले आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, कंगनाला माफी मागण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser