आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे ख्रिस्तोफर नोलन यांच्या ‘टेनेट’ या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी काम केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने डिंपल यांनी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत काम केले. यानिमित्ताने डिंपल कपाडिया यांच्याशी केलेली ही खास बातचीत
ख्रिस्तोफर नोलनच्या दिग्दर्शनाची पद्धत बॉलिवूडपेक्षा किती वेगळी वाटली ?
ख्रिस्तोफर नोलन यांचा चित्रीकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. ते खूप लक्ष केंद्रित करतात. नेहमीच त्यांच्या स्क्रिप्टमध्ये काहीतरी लपवतात. ते पूर्ण फोकस कामावर करतात आणि त्यांचे पाहून टीमही पूर्ण कामावर लक्ष देते, ही त्यांची खासियत आहे. एकदा त्यांचा चित्रपट पाहिल्यानंतर दुसऱ्यांदा- तिसऱ्यांदा पाहण्याची इच्छा होते. कथेत अधिक खोलवर जाणे, ही ख्रिस्तोफरची शैली आहे. मी त्यांचा प्रेस्टिज हा चित्रपट चार वेळा पाहिला आहे.
तुम्हाला ही भूमिका कशी मिळाली आणि तुम्ही कशी तयारी केली ?
माझ्या भूमिकेसाठी मला कास्टिंग डायरेक्टरने बोलावले तेव्हा मी तेथे ऑडिशनसाठी गेले. मात्र त्यांना पाहून गोंधळले. ते समोर असल्यामुळे मला घाबरल्यासारखे होतेय असे मी त्यांना सांगितले. यावर ख्रिस्तोफरने हातात कॅमेरा घेत शूट केले आणि माझ्याशी गप्पा मारत भीती घालवली. निवड झाल्यानंतर, ख्रिस्तोफरने मला केस पांढरे करावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे मी केस पांढरे केले.
कोरोना काळात लोक चित्रपटगृहात जातील का ? तुमच्या निवडीवर लोकांची काय प्रतिक्रिया होती ?
नोलनसारख्या दिग्दर्शकांचे भारतात लाखो चाहते आहेत. या वेळीदेखील, लोक पूर्ण काळजी घेत हा चित्रपट नक्कीच पाहतील. हा चित्रपट 4 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित झाला. माझी आई माझ्या निवडीमुळे खूप आनंदित झाली. ट्विंकल आणि अक्षय यांनाही खूप अभिमान वाटला. माझी नातवंडे नितारा आणि आरवही या बातमीबद्दल खूप उत्सुक होते, कारण इतक्या मोठ्या दिग्दर्शकामुळे मला आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण करण्याची संधी मिळाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.