आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाला दिलासा नाही:कंगना रनोटचे खारमधील घरातील वाढीव बांधकाम अनधिकृत, दिंडोशी न्यायालयाचा मोठा झटका

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाचे पश्चिम खार भागात तीन फ्लॅट्स आहेत.

अभिनेत्री कंगना रनोट हिला दिंडोशी न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. कंगनाच्या पश्चिम खार येथील ऑर्किड ब्रीझ इमारतीतील पाचव्या मजल्यावरील राहत्या घरात केलेल्या वाढीव बांधकामाला न्यायालयाने अनधिकृत असल्याचे सांगितले आहे. न्यायालयाने तिला या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यांनतर पालिका कंनानाने घरात केलेल्या अनधिकृत बांधकामाची तोडफोड करु शकते.

कंगनाला 2018 मध्ये बजावली होती नोटिस
ही अनधिकृत बांधकामे तोडण्याविषयी महापालिकेने 2018 मध्ये कंगनाला नोटिस बजावली होती. हा आदेश रद्द करण्यासाठी तिने न्यायालयात अर्ज केला होता. मात्र आता तो दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एल.एस. चव्हाण यांनी फेटाळून लावला आहे.

16 मजली ऑर्किड ब्रीझ इमारतीत काहींनी इमारतीच्या मंजूर आराखड्याचे उल्लंघन करत तसेच पालिकेच्या परवानगीविना फ्लॅट्सचे एकत्रिकीकरण व अतिरिक्त बांधकाम केले आहे, अशा आरोपाखाली पालिकेने 2018 मध्ये त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यात कंगनाचाही समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...